---Advertisement---

U19 World Cup 2023 । अजिंक्य राहत भारताची उपांत्य सामन्यात धडक, इतर दोन संघांनीही गाठली पुढची फेरी

Sachin Dhas
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसी 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले. सुपर सिक्स फेरीतील आपला शेवटचा सामना भारताने शुक्रवारी (2 फेब्रुवारी) नेपाळविरुद्ध खेळला. उदय सहारन आणि सचिन धस यांनी शतके ठोकली आणि भारताला 132 धावांनी विजय मिळवून दिला. शुक्रवारी भारतीय संघसाह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ देखील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचले.

भारतीय संघ सुपर सिक्समध्ये ग्रुप 1 मध्ये होता. या फेरीतील शेवटचा सामना भारताने नेपाळविरुद्ध शुक्रवारी ब्लोमफोंटिनमध्ये खेळला गेला. नाणेफेक जिंकून भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला. 50 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 297 धावा संघाने केले. नेपाळसाठी गुलशन झा याने तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात नेपाळ संघाने 50 षटके खेळून काढली. पण संघ 9 विकेट्सच्या नुकसानावर 165 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सौम्य पांडे याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

भारतासाठी या सामन्यात कर्णधार उदय सहारन याने 107 चेंडूत 100 धावा कुटल्या. तसेच सचिन धस याने 101 चेंडूत 116 धावांची वादळी खेळी केली. धसला यासाठी सामनावीर पुरस्कार देखील मिळाला. इंग्लंडसाठी गुलसन झा याने 10 षटकात 56 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. आकाश चंद यानेही एक विकेट घेतली.

शुक्रवारीच सुपर सीक्स फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजवर 108 धावांनी विजय मिळवला. तसेच दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचले. (India’s place in the semi-finals of the Under-19 World Cup confirmed)

महत्वाच्या बातम्या – 
यशस्वी जयस्वाल सोडता भारताचे सर्व फलंदाज फ्लॉप, अँडरसन पुन्हा फॉर्मात, शनिवारी पहिल्या सत्रात भारत सर्वबाद
यशस्वी जयस्वाल शो! ठोकले कारकिर्दीतील पहिले द्विशतक, वायझॅकच्या अवघड खेळपट्टीवर पाडला धावांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---