आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. टी२० विश्वचषकातील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. टी२० विश्वचषकाच्या सुरुवातील भारतीय संघाला स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी प्रवळ दावेदार मानले जात होते. मात्र, संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. अशात भारतीय संघाले माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्यांचे महत्वाचे मत व्यक्त केले आहे. गावसकरांनी भारत आणि इंग्लंडच्या फुटबॉल संघाची तुलना केली आहे.
टी२० विश्वचषकात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील रविवारी(७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आणि भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. न्यूझीलंडने या विजयानंतर ग्रुप दोन मधून उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. यापूर्वी पाकिस्तान ग्रुप दोन मधील उपांत्य सामन्यात पोहचणार पहिला संघ ठरला होता. तर ग्रुप एक मधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य सामन्यात पोहोचले आहेत. भातीय संघ स्पर्धेतून बाहेर गेला असून सुनील गावसकरांच्या मते भारतीय क्रिकेट संघाची अवस्था अगदी तशीच झाली आहे, जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये झाली आहे.
भारतात खेळली जाणारी आयपीएल स्पर्धा जगभरात पाहिली जाते आणि या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू खेळतात. असे असले तरीही भारतीय संघ विश्वचषकात मात्र कमाल करू शकला नाही. आयपीएलप्रमाणेच किंवा त्याहीपेक्षा जास्त इंग्लिश फुटबॉल लीग प्रसिद्ध आहे. अशात ही लीग लोकप्रिय असली म्हणून इंग्लंडचा फुटबॉल संघ विश्वचषक जिंकेल, असे होऊ शकत नाही, असे मत गावसकरांनी मांडले आहे.
गावसकरांनी त्यांच्या कॉलममध्ये लिहिले की, अजून एका विश्वचषकातील निराशा झाल्याने दाखवून दिले आहे की, भारताकडे जगातील सर्वात चांगली आणि आकर्षक टी२० टूर्नामेंट आहे, पण जेव्हा विश्वचषकाची गोष्ट येते, तर मग भारतीय खेळाडूंना कमाल करत येत नाही. हे अगदी तसेच आहे, जसे इंग्लंडचे फुटबॉलमध्ये आहे. इंग्लिश प्रीमियर लीग शक्यतो जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त पाहिली जाणारी फुटबॉल लीग आहे, जेथे आयपीएलप्रमाणे जगातील उत्कृष्ट फुटबॉलपटू खेळतात. पण याचा अर्थ असा नाही की, इंग्लंड विश्वचषक जिंकेल.’
‘कदाचीत या लीगच्या बनवल्या गेलेल्या हाइपच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या अपेक्षांमुळे मीडिया आणि प्रशंसक आपला संघ मैदानावर उतरताच जिंकण्याची अपेक्षा करू लागतात. यासर्व भाकितांमुळे इतर संघ क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध आणि फुटबॉलमध्ये इंग्लंडविरुद्ध मजबूत इच्छाशक्तीने खेळतात.’
भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर गेले असला तरी संघाने सोमवारी नामिबियाविरुद्ध त्यांचा शेवटचा सामना जिंकला आणि विराट कोहलीच्या टी२० कर्णधारपदाचा शेवट विजयाने झाला. विराट कोहलीसाठी हा कर्णधाराच्या रूपातील शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना होता.
महत्त्वाच्या बातम्या –
अफलातून खेळीसह राहुलने मिळवले दिग्गजांच्या पंक्तित स्थान
महाराष्ट्राचा विजयरथ सुसाट! केदारचे दमदार अर्धशतक; अझीम काझीची शानदार हॅट्रिक






