टोकियोमध्ये सध्या पॅॅरालिम्पिकचा थरार सुरु आहे. यंदा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत सर्वाधिक पदकांची लयलूट करण्याचा विक्रम केला आहे. आता भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे. पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत (एसएल३) सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. एवढेच नाही, तर याच क्रीडा प्रकारात मनोज सरकारने कांस्यपदक जिंकले आहे.
प्रमोदने शनिवारी (४ सप्टेंबर) अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेल याचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. अव्वल मानांकित प्रमोदचे या सामन्यात पुर्णपणे वर्चस्व होते. त्याने पहिला सेट २१ मिनिटातच २१-१४ अशा फरकाने जिंकला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये डॅनिएलने चांगली सुरुवात करताना १२-६ अशी आघाडी घेतली आणि प्रमोदला दबावात टाकले होते. मात्र, प्रमोदने सुरेख पुनरागमन करत १५-१५ अशी बरोबरी साधली आणि २१-१७ असा सेट जिंकत सामनाही जिंकला.
वयाच्या ५ व्या वर्षी पोलिओमुळे डाव्या पायात अपंगत्व आलेल्या प्रमोदने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एकूण चौथे सुवर्णपदकाची भर टाकली आहे. यापूर्वी भारतासाठी नेमबाज अवनी लखरा, भालाफेकपटू सुमीत अंतिल आणि नेमबाज मनिष नरवाल यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
#IND have another #gold medal – and there's not a dry eye in the house! 🥲
Many congratulations, Pramod Bhagat – Paralympic champion! 🇮🇳🤩#ParaBadminton #Paralympics #Tokyo2020
🏸 @BadmintonTalk pic.twitter.com/t32xdMP7Z8
— Paralympic Games (@Paralympics) September 4, 2021
मनोजला कांस्यपदक
याच क्रीडाप्रकारात भारताच्या मनोज सरकारने कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या दैसुके फुजीहाराला २२-२०, २१-१३ अशा फरकाने पराभूत केले. याबरोबरच कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये पुरुषांच्या एकेरी एसएल३ प्रकारात भारताला दोन पदकं मिळाली.
त्यामुळे आता भारताच्या टोकियो पॅरालिम्पिकमधील पदकांच्या संख्या १७ झाली आहे. भारताच्या खात्यात आत्तापर्यंत ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळाचा समावेश झाला आहे.
@manojsarkar07 wins #Bronze 🥉at #Tokyo2020 #Paralympics #Badminton Men's Singles SL3! Double Podium Finish has become #India's thing at #TokyoParalympics!🤩✨🤩 #Praise4Para #Parabadminton #UnitedByEmotion #StrongerTogether
Medal no.1️⃣7️⃣ for India at #ParalympicsTokyo2020 🎉🏸 pic.twitter.com/PKkdBMQo2z— Paralympic India 🇮🇳 (@ParalympicIndia) September 4, 2021
प्रमोदला आणखी एक पदक जिंकण्याची संधी
प्रमोद टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पलक कोहलीसह मिश्र दुहेरी (एसएल३-एसयू५) प्रकारातही सहभागी झाला आहे. प्रमोद आणि पलक यांना रविवारी कांस्यपदकाचा सामना खेळायचा आहे. हा सामना जपानच्या दैसुके फुजीहारा आणि एकिको सुजिनो या जोडीविरुद्ध होणार आहे. या सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास भारताच्या खात्यात कांस्यपदकाची भर पडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बड्डेदिनी ‘या’ ३ भारतीय क्रिकेटपटूंना बसाव लागलं बाकावर; इशांत, शमीचाही समावेश
युएई टप्प्यासाठी DC च्या नेतृत्त्वाचे चित्र स्पष्ट; पंत की अय्यर, कोणाला मिळणार ‘गुड न्यूज’?