पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात बुधवारपासून (१९ जानेवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका (ODI series) खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे होणार असून भारतीय संघ या मालिकेत केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे. पहिल्या वनडे सामन्यासाठी अनेक बदल भारतीय संघात दिसू शकतात.
अशी असू शकते वरची फळी
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या केएल राहुलने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, तो सलामीला फलंदाजी करेल. याबरोबरच शिखर धवनचे भारतीय संघात पुनरागमन झालेले असल्याने तोच पहिल्या वनडेत केएल राहुलसह सलामीला फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.
याशिवाय विराट कोहलीने नेतृत्त्वपद सोडले असले, तरी तो खेळाडूच्या रुपात भारतीय संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे तो त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो.
मधली फळी निवडणे ठरणार डोकेदुखी
भारतीय संघव्यवस्थापनासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताची मधली फळी निवडणे डोकेदुखी ठरणार आहे. कारण, मधल्या फळीसाठी सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत असे अनेक पर्याय आहेत. त्यातही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतची जागा जवळपास पक्की मानली जात आहे.
असे असताना सूर्यकुमार, ऋतुराज आणि श्रेयस यांच्यातील कोणत्या दोघांनी अंतिम ११ जणांमध्ये संधी द्यावी हा मोठा प्रश्न संघव्यवस्थापनासमोर असेल. तरी श्रेयसचा फॉर्म आणि अनुभव पाहता त्याला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या जागेसाठी संधी दिली जाऊ शकते. श्रेयसने नुकतेच दोन महिन्यांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करताना एकाच सामन्यात शतक आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम केला होता.
याबरोबरच सूर्यकुमार आणि ऋतुराज यांचा विचार केल्यास सूर्यकुमारकडे अनुभव असला तरी तो गेल्या काही महिन्यांत त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसला आहे. तसेच ऋतुराजकडे फारसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही, मात्र तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने २०२१ वर्षात खेळलेल्या जवळपास सर्वच स्पर्धांत धावांचा पाऊस पाडला आहे. पण, पहिल्या वनडेसाठी संघव्यवस्थापन सूर्यकुमारच्या अनुभवावर विश्वास ठेवून त्यालाच पाचव्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी स्थान दिले जाऊ शकते आणि ऋतुराजला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागू शकते. (India’s Predicted XI)
अधिक वाचा – कसोटीचा कर्णधार झाल्यास विराटचे कोणते गुण घेऊन पुढे जाशील? केएल राहुलने सांगितले...
अष्टपैलू खेळाडू
अष्टपैलू खेळाडू म्हणून वेंकटेश अय्यरला वनडे पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. त्याच्या नावासाठी केएल राहुलनेही पत्रकार परिषदेत पसंती दर्शवली होती. वेंकटेशने यापूर्वी भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता त्याला वनडे पदार्पणाचीही संधी मिळू शकते.
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
गोलंदाजी फळी
आर अश्विन या भारताच्या अनुभवी फिरकीपटूने वनडे संघात जवळपास ४ वर्षांनी पुनरागमन केले आहे. पण, असे असले तरी पहिल्या वनडेसाठी युजवेंद्र चहलला प्राधान्य दिले जाऊ शकते. चहलने गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दमदार प्रदर्शन केले होते. त्याने ६ वनडेत १६ विकेट्स घेतल्या होत्या.
याशिवाय वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर या अनुभवी वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना पुरक असल्याने भारतीय संघ अनुभवी वेगवान आक्रमणच आजमवण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या वनडेसाठी संभावित ११ जणांचा भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, भूवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ ३ विकेट्स अन् चहल ‘या’ खास शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार मोठा विक्रम
टीम इंडियाला दिलासा! दक्षिण आफ्रिकेचा ‘सबसे बडा मॅचविनर’ वनडे मालिकेतून बाहेर
वनडे मालिकेत टीम इंडियाला छळू शकतो पदार्पणवीर वेगवान गोलंदाज