---Advertisement---

भारताचा वेस्ट इंडीज दौरा । 16 सदस्यीय संघावार टाका एक नजर, विराट-रोहितला विश्रांती

On: रविवार, जून 4, 2023 9:19 PM
Cheteshwar Pujara
---Advertisement---

भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तयारीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 7 जूनपासून इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. या महत्वाच्या सामन्यांतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौरा करणार आहे. दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका भारतायाला या दौऱ्यात करायच्या आहेत. बीसीसीआय या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी देईल, अशी पूर्ण शक्यता आहे. चला तर या दौऱ्यासाठी भारताच्या संभावित 16 सदस्यीय संघावर नजर टाकू.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते खासकरून युवा खेळाडूंना संधी देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट आणि नुकत्याच पार पडलेल्या आयीपएल हंगामात चांगले प्रदर्शन केले, त्यांना या दौऱ्यात संधी मिळू शकते. युवा आणि वरिष्ठ खेळाडूंचा योग्य ताळमेळ या दौऱ्यात साधण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनाचा असेल. चला तर जाणून घेऊ वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते. माहितीनुसार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा या खेळाडूंना वेस्ट इंडीज दौऱ्यात विश्रांती दिली जाणार आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यात सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव संघासोबत असू शकतात. या दोघांनी मागच्या काही वर्षांमध्ये भारतासाठी फक्त कसोटी क्रिकेट खेळले आहे. अशात वेस्ट इंडीजमध्ये त्यांना पुन्हा कसोटी सामन्यासाठी निवडले जाऊ शकते. चेतेश्वर पुजारा या सामन्यात संघाचे नेतृत्व करू शकतो. यापूर्वीही त्याने संघाचे उपकर्णधारपद सांभाळले आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यात शुबमन गिल सलामीवीर म्हणून खेळेल, अशी पूर्ण खात्री वर्तवली जात आहे. गिलचा जुना सहकारी पृथ्वी शॉ देखील या दौऱ्यात खेळेल. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी हा हंगाम चांगाल गेला आहे. अजिंक्य रहाणेल 18 महिन्यानंतर डब्ल्यूटीसी फायनलमधून संघात पुनरागमन करत आहे. अशात वेस्ट इंडीज दौऱ्यातही त्याला संघात कायम ठेवले जाईल. सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल यांनीही अलिकडच्या काळात चमकदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ईशान किशन आणि संजू सॅमसन यांना संधी मिळेल.

अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकुर या दोन अष्टपैलूंनाही 16 सदस्यीय संघात निवडले जाऊ शकते. वेगवान गोलंदाजांचे नेतृत्व उमेश यादव करेल. त्याला मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांची साध मिळू शकते. फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई या तीन नावाचा समावेश असू शकतो. (India’s probable 16-man squad for West Indies tour)

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ –
शुबमन गिल, पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, उमेश यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिंकूला शर्टलेस पाहून शुबमन गिलची बहीण फिदा! नितीश राणाच्या पत्नीनेही केली कमेंट
विराटला पारखलेल्या दिग्गजाने केली गिलची वाहवा, म्हणाले, “तो परिपूर्ण, भारताचे भविष्य”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---