भारत-इंग्लंड (India vs England) संघात आगामी 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात (6 फेब्रुवारी) पासून होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसेल. या वनडे मालिकेला खूप महत्त्व आहे, कारण भारतीय संघ ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (champions trophy 2025) आधी खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची मजबूत प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे आपण जाणून घेऊया.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), शुबमन गिल (shubman Gill) सलामीवीर म्हणून दिसू शकतो. दोघेही संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार आहेत. त्यामुळे ते खेळणार हे निश्चित आहे. हीच जोडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सलामी देताना दिसू शकते. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर तर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. या दोघांवर मधल्या फळीची जबाबदारी असेल. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुलला (KL Rahul) पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. मात्र, पंत हा डावखुरा फलंदाज असल्याने त्याला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.
यानंतर अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले, तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांना संधी मिळू शकते. हे तिन्ही खेळाडू फलंदाजीशिवाय गोलंदाजीही करू शकतात. संघाचा तिसरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) असू शकतो. यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या 2 वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. या गोलंदाजांची चॅम्पियन्स ट्रॉफी संघातही निवड झाली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारताची मजबूत प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; बुमराह, हार्दिक असताना शुबमन गिल उपकर्णधार का?
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य