राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळाले. सतिशकुमार शिवलिंगने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले.
७७ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. त्याने स्नच प्रकारात १४४ तर क्लीन आणि जर्क प्रकारात १७३ किलो वजन उचलले.
भारताचे हे स्पर्धेतील तिसरे सुवर्ण तर एकूण पाचवे पदक ठरले. त्यामुळे भारत पदतालिकेत आता पुन्हा तियऱ्या स्थानी आला आहे.
स्नच प्रकारात सतिशकुमार शिवलिंगने पहिल्या प्रयत्नात १३६, दुसऱ्या प्रयत्नात १४० तर तिसऱ्या प्रयत्नात १४४ किलो वजन उचलले
क्लिन आणि जर्क प्रकारात त्याने पहिल्या प्रयत्नात १६९, दुसऱ्या प्रयत्नात १७० तर वजन उचलले.
यामुळे त्याने एकूण ३१७ किलो वजन उचलत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवुन दिले.
2016 रीओ आॅलिंपीकमध्येही या खेळाडूने ३२९ किलो वजन उचलले होते परंतु पदक जिंकण्यात अपयश आले होते. तर २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धेत त्याने ३२८ किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले होते.
https://twitter.com/Maha_Sports/status/982441615867326464