---Advertisement---

आयसीसी रँकिंगमध्ये भारताची एकहाती सत्ता! संघासह खेळाडूंही सर्वोत्तम स्थानांवर

Team India (ODI vs AUS)
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने शुक्रवारी (22 सप्टेंबर) 5 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 276 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 48.4 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 281 धावा केल्या आणि वजय मिळवला. तीन सामन्यांतील विजयानंतर वनडे मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. पण वनडे रँकिंगमध्येही भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या सामन्यात भारताने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमधून चांंगले प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. या विजयानंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC Ranking) भारतीय संघ पाकिस्तानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. कसोटी आणि टी-20 रँकिंगमध्ये भारत आधीच पहिल्या क्रमांकावर आहे. परिणामी शुक्रवारी संध्याकाळी भारतीय संघ आयसीसी कसोटी, वनडे आणि टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला. संघाच्या या कामगिरीव्यतिरिक्त भारतीय खेळाडू देखील रँकिंगमध्ये मागे नाहीत.

टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकाच फलंदाज आहे. तर वनडे रँकिंगमध्ये मोहम्मद सिराज सर्वोत्तम गोलंदाज आहे. कसोटी रँकिंगमध्ये रविचंद्रन अश्विन सर्वोत्तम गोलंदाज आहे. तर कसोटी रँकिंमध्ये अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा पहिल्या, तर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याव्यतिरिक्त वनडे फलंदाजांच्या यादीत शुबमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पंड्या दुसऱ्या, तर कसोटी गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे. (India’s single-handed rule in the ICC rankings! )

आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ आणि खेळाडूंची कामगिरी –
सर्वोत्तम कसोटी संघ – India
सर्वोत्तम टी-20 संघ – India
सर्वोत्तम वनडे संघ – India
सर्वोत्तम टी-20 फलंदाज  – Surya
सर्वोत्तम वनडे गोलंदाज – Siraj
सर्वोत्तम कसोटी गोलंदाज – Ashwin
सर्वोत्तम कसोटी अष्टपैलू – Jadeja
दुसऱ्या क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू – Ashwin
दुसऱ्या क्रमांकाचा वनडे फलंदाज – Gill
दुसऱ्या क्रमांकाचा टी-20 अष्टपैलू – Hardik
तिसऱ्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज – Jadeja

महत्वाच्या बातम्या – 
टीम इंडियाने मारलं मोहालीच मैदान! वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा
“विराटने मला प्रेरणा दिली”, पीव्ही सिंधूने उलगडला आयुष्यातील कठीण काळ

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---