भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. दौऱ्यात सुरुवातील कसोटी आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. अशात बीसीसीआयने शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली.
इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम गाजवल्यानंतर अजिंक्य रहाणे () याला भारताच्या कसोटी संघात पुन्हा सामील करण्यात आली. रहाणे भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळला. आता आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यातही त्याला संघात घेतले गेले आहे. रहाणे वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाच्या उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. त्याचसोबत आयपीएल 2023 मधील प्रदर्शनाच्या जोरावर यशस्वी जयस्वाल यालाही कसोटी संघात घेतले गेले आहे. ऋतुराज गायकवाड मागच्या काही वर्षांमध्ये भारताचा महत्वाचा फलंदाज बनला आहे. पण यावेळी पहिल्यांदाच त्याला कसोटी संघात निवडले गेले आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठीही त्याला संघात घेतले गेले होते. मात्र लग्नामुळे तो या दौऱ्यात उपस्थित राहू शकला नव्हता.
वनडे संघात धेखील मोठे बदल पाहायला मिळाले आहेत सोबतच संजू सॅमसन देखील मोठ्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो. सॅमसनला वनडे संघात संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार देखील या दैऱ्यात भारतासाठी पदार्पण करू शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कसोटी आणि वनडे दोन्ही मालिकांमध्ये विश्रांती दिली गेली आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिका येत्या 12 जुलै रोजी सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना 20 ते 24 जुलैदरम्यानत खेळला जाईल. त्यानंतर उभय संघांतील वनडे मालिका 27 जुलै रोजी सुरू होईल, जी 1 ऑगस्टला संपेल. (India’s squads for West Indies Tests and ODI series announced.)
महत्वाच्या बातम्या –
6, 6, 6, 6, 6 । इंग्लिश फलंदाजाची वादळी खेळी, आरसीबी कॅम्पमध्ये आनंदाची लाट
फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजावर आयसीसीकडून बंदी, वाचा वर्ल्ड कप क्वॉलिफायर सामन्यात काय घडलं