भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात आगामी 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत जो संघ होता, त्याच संघावर निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरु येथे होणार आहे. पण भारताचा युवा खेळाडू न्यूझीलंविरूद्ध आपला पहिलाच कसोटी सामना खेळणार आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारताच्या 15 सदस्यीय संघात नाही. शमीला दुखापतीतून सावरण्यासाठी अधिक संधी देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शेवटच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पुरुष विश्वचषक फायनलनंतर शमी भारताकडून खेळताना दिसला नाही. तेव्हापासून अजूनही तो भारतीय संघापासून दूर आहे.
भारताचे काही खेळाडू प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहेत. त्यातील एक म्हणजे युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल. भारताचा स्टार फलंदाज जयस्वालने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. आता तो प्रथमच न्यूझीलंडविरूद्ध खेळताना दिसणार आहे. 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या जयस्वालने आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर आक्रमण केले आहे. तो केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
महत्त्वाच्या बातम्या-
PAK vs ENG; “क्लब संघ यापेक्षा चांगले क्रिकेट खेळतात” माजी खेळाडूने पाकिस्तानवर सोडले टीकास्त्र
IND vs NZ; कसोटी मालिकेत कोहली रचणार इतिहास! पुजारा, सेहवागला टाकणार मागे
T20 World Cup; भारत पोहोचणार सेमीफायनलमध्ये? असे असणार समीकरण