नवी दिल्ली | भारताची आघाडीची महिला रेसर मिरा एरडा ही इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली असून पुढील वर्षी होणा-या डब्ल्यु सिरीजसाठीच्या 50 एलिट ड्रायव्हर्सच्या यादीत तिचा समावेश झाला आहे. आयोजकांनी बुधवारी याची माहिती दिली.
जगातील एकमात्र महिला रेसिंग स्पर्धा असलेल्या या स्पर्धेसाठी 30 वेगवेगळ्या देशातून स्पर्धक येतात त्यामध्ये ती सर्वाची कमी वयाची रेसर आहे. ट्रायल्सनंतर अंतिम 18 जणांची निवड करण्यात येते.मे 2019 पासून या रेसिंग स्पर्धेची सुरुवात होते. जेके टायर एफएमएससीआय नॅशनल रेसिंग अजिंक्यपद स्पर्धेतील युरो जे के गटात 2017 साली मिराने चमक दाखवली. मिरासोबतच स्नेहा शर्मा ही एलजीबी-4 गटात सहभागी होते. तिला देखील 100 जणांच्या यादीत संधी मिळाली आहे.
डब्ल्यु सिरीजमध्ये एकूण 1.5 मिलियन बक्षीस देण्यात येते. यासोबतच पाच लोख डॉलरचे इनाम मिळणार आहे.मोटरस्पोर्ट्समध्ये देखील आपल्याला भेद पाहण्यास मिळतो आणि डब्ल्यु सिरिजच्या माध्यमातून महिला रेसरना व्यासपीठ उपलब्ध करता येते. सुरुवातीच्या प्रतिसादामुळे आम्ही आनंदी आहोत असे डब्ल्यु सिरीजच्या सीईओ कॅथरीन बाँड मुईर म्हणाल्या. निवड झालेल्या महिला रेसरना पुढच्या स्तरावरील तयारीकरता दोन महिन्यांचा वेळ मिळणार आहे. ट्रायल्समध्ये ट्रॅक, फिटनेस टेस्ट, मानसिकदृष्ट्या तयारी यासोबत ड्राईव्हिंगचे कौशल्य पाहिले जाईल. माजी एफ वन स्टार्स डेविड काऊथार्ड आणि अॅलेक्स वुर्झ हे निरिक्षण असणार असून त्यांच्यासोबत डब्ल्यु सिरिजच्या रेसिंग संचालक डेव रायन असतील.
हंगामातील पहिली स्पर्धा जर्मनीच्या हॉकेनहिम येथे 3 मे ला होणार आहे. जगातील महिला रेसरना आपले कौशल्य दाखवता यावे यादृष्टीने डब्ल्यु सिरिजची आखणी करण्यात आली आहे.त्यामुळे नक्कीच या गटात चांगले कौशल्य पहायला मिळण्याची अपेक्षा आहे असे डेव्हिड काऊल्थार्ड म्हणाले. वडोदराच्या मिराने आपल्या प्रवासाला राष्ट्रीय कार्टिंगपासून सुरुवात केली. त्यानंतर तिने एलजीबी फॉर्म्युला 4 मध्ये सहभाग नोंदवला. 2017 साली तिने फॉर्म्युला 4 रूकी चॅम्पियन ऑफ द ईयरचा किताब मिळवला.