भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे सध्या क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. सध्या पंत आपल्या दुखापतीवर बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करत आहे. याच ठिकाणी पंत आणि भारताच्या 16 वर्षांखालील संघाची भेट झाली. युवा खेळाडूंसाठी पंतसोबतची ही भेट फायदेशीर ठरल्याचे बोलले जात आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतच्या गाडीचा अपघात झाला होता, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला.
भारतीय क्रिकेटन नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 16 वर्षांखालील हाय परफॉर्मंस कॅम्पच्या खेळाडूंसोबत पंतने एनसीएसमध्ये चर्चा केली. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि भारताच्या भावी स्टार क्रिकेटपटूंमधील ही चर्चा बराच वेळ चालली. क्रिकेट, आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि यशस्वी होण्यासाठी घ्यावे लागणारे कष्या याविषयीची चर्चा बराच वेळ लांबली.
The boys who are part of the Under-16 high performance camp at NCA Bangalore had the opportunity to interact with Rishabh Pant on cricket, life, hard work and much much more 👌🏻👌🏻
It was very generous of @RishabhPant17 to spare time for interacting with these young boys 👏🏻👏🏻 pic.twitter.com/cBFfLu0nJC
— BCCI (@BCCI) May 9, 2023
डिसेंबर 2022मध्ये झालेल्या कार अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी पंतला अजून काही महिने वेळ लागणार आहे. या अपघातानंतर भारताने जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध ट-20 आणि वनडे मालिका खेळली. या मालिकेतून पंतेच नाव वगळण्यात आले. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे, टी-20मालिकेतू आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. येत्या काळात जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला देखील पंत मुकणार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयसीसी वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. विश्वचषकातूनही पंतला नाव माघारी घ्यावे लागणार, असेच सध्या दिसत आहे.
Happy NO MORE CRUTCHES Day!#RP17 pic.twitter.com/mYbd8OmXQx
— Rishabh Pant (@RishabhPant17) May 5, 2023
दरम्यान काही दिवसांपूर्वी पंतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एनसीएमधील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत पंत कोणत्याच आदाराविना चालताना दिसत आहे. (India’s under-16 players got Rishabh Pant’s guidance, met in NCA)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सनी लिओनीने व्यक्त केले धोनीविषयी आपले प्रेम! आयपीएलमधील ‘या’ संघाची आहे फॅन
‘गोलंदाजाला कुणी बोललं तर राग…’, फिल सॉल्टशी झालेल्या बाचाबाचीवर सिराजचा मोठा खुलासा