आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सध्या एकाच खेळाडूचा बोलबाला सुरू आहे. त्याने आपल्या धमाकेदार आणि वैविध्यपूर्ण फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांची मने जिंकली आहे. तो आहे भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव. आजच्या घडीला तो पुरूष टी20 फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याने मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केले, मात्र एका बाबतीत तो अजूनही मागे राहिला आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची आयसीसी टी20 क्रमवारीतील रेटिंग पाहिली, तर त्याची सर्वोच्च रेटिंग 895 राहिली. ही त्याने 19 नोव्हेंबरला नोंदवली होती. सध्या त्याची रेटिंग 890 आहे. भारतीय खेळाडूंची टी20 फलंदाजी आयसीसी क्रमवारीची रेटिंग पाहिली, तर अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 897 राहिले. जी त्याने 2014च्या सप्टेंबर महिन्यात नोंदवली होती. सध्या तो टी20 क्रमवारीत दोन स्थानांनी घसरला असून 13व्या स्थानावर आहे. त्याने 2015च्या ऑक्टोबर महिन्यात पहिले स्थान सर्वात आधी गाठले होते.
विराट आणि सूर्यकुमार यांच्यानंतर सर्वोच्च रेटिंगमध्ये केएल राहुल (KL Rahul) तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे जुलै 2018मध्ये 854 रेंंटिग होते. तसेच त्याची आयसीसीमधील सर्वोत्कृष्ठ क्रमवारी स्थान दुसरे राहिले आहे. हे त्याने 2018 मध्येच गाठले होते. सध्या तो सुद्धा दोन स्थानांनी घसरला असून ताज्या क्रमवारीनुसार तो 18व्या स्थानावर आहे.
सूर्यकुमारचा फॉर्म पाहता विराटचा टी20 रेटिंगचा विक्रम लवकरच मोडला जाण्याची शक्यता आहे. नुकतेच सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली. ही त्याची या वर्षातील दुसरी शतकी खेळी ठरली. याआधी त्याने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच 117 धावांची खेळी केली आणि न्यूझीलंड विरुद्ध शतक करताच एकाच वर्षात आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दोन शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याची बरोबरी केली.
सूर्यकुमारने 2022मध्ये आतापर्यंत 31 सामन्यंमध्ये 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. Highest ratings achieved by Indian players in the T20 batters ranking
टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मिळवलेले सर्वोच्च रेटिंग:
1) विराट कोहली – 897
२) सूर्यकुमार यादव – 895*
3) केएल राहुल – 854
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आमच्याकडे कितीही पैसे असले तरी आम्ही सूर्यकुमार यादवला बीबीएलमध्ये…’, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचे विधान
‘तिसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेण्याच्या विचारात होतो’, मालिका जिंकल्यानंतर अर्शदीपची खास प्रतिक्रिया