भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याचे वेळापत्रक सोमवारी (12 जून) बीसीसीआयने जाहीर केले. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23चे विजेतेपद पटकावण्याची संधी रविवारी (11 जून) भारताने गमावली. अशातच सोमवारी बीसीसीआयने वेस्ट इंडीज दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषण केली.
भारतीय संघाला या वेस्ट इंडीज दौऱ्यात सर्वात आधी कसोटी, नंतर वनडे आणि शेवटी टी-20 मालिका खेळायचा आहे. कसोटी मालिकेची सुरुवात 12 जुलै रोजी होणार आहे. पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलैदरम्यान डोमिनिकामध्ये खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलैदरम्यान त्रिनिदादमध्ये आयोजित केला गेला आहे. वनडे मालिकेची सुरुवात 27 जुलै रोजी होईल. मालिकेतील दुसरा सामना 29 जुलै, तर तिसरा सामना 1 ऑगस्ट रोजी आयोजित केला गेला आहे. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने बार्बाडोसमध्ये, तर शेवटचा सामना त्रिनिदादमध्ये आयोजित केला गेला आहे.
उभय संघांतील टी-20 मालिकेची सुरुवात होईल 3 ऑगस्ट रोजी. मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 6 आणि 8 ऑगस्ट रोजी गयानामध्ये पार पडेल. शेवटचे दोन सामने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये आयोजित केले आहेत.
भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा 2023 –
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटी मालिका
12-16 जुलै: पहिला कसोटी सामना, डोमिनिका
20-24 जुलै: दुसरा कसोटी सामना, त्रिनिदाद
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत वनडे मालिका
27 जुलै: पहिला वनडे सामना, बार्बाडोस
29 डुलै: दुसरा वनडे सामना, बार्बाडोस
1 ऑगस्ट: तिसरा वनडे सामना, त्रिनिदाद
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत टी-20 मालिका
3 ऑगस्ट: पहिला टी-20 सामना, त्रिनिदाद
6 ऑगस्ट: दुसरा टी-20 सामना, गयाना
8 ऑगस्ट: तिसरा टी-20 सामना, गयाना
12 ऑगस्ट: चौथा टी-20 सामना, प्लोरिडा
13 ऑगस्ट: पाचवा टी-20 सामना, फ्लोरिडा
भारतीय वेळेनुसार वेस्ट इंडीजविरुद्धचे कसोटी सामने सायंकाळी 7.30 मिनिटांनी सुरू होईल. वनडे सामने सायंकाळी 7 वाजता, तर टी-20 सामने सायंकाळी 8 वाजता सुरू होतील. दरम्यान वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाचे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन युवा आणि आयपीएल 2023 हंगाम गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी देऊ शकतात. तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो (India’s West Indies tour announced by BCCI)
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या मागण्या वाढतच जातील! हिटमॅनवर बसरला माजी दिग्गज कर्णधार
आयसीसीच्या मानाच्या तिन्ही ट्रॉफी उंचावणारे ऑसी पंचरत्न! स्वतः आयसीसीने शेअर केली पोस्ट