आगामी आय़पीएलची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. तत्पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंचे संघ बदलताना दिसतील. प्रत्येक संघात स्टार खेळाडू देखील पाहायला मिळणार आहेत. यातील एक मोठे नाव असू शकते भारताचा स्टार युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant). आगामी आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो. तो सोडून चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) सामील होऊ शकतो. याबाबत स्वत: पंतनं मोठा इशारा दिला आहे.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीलमध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) खेळतो. तो बरेच वर्ष या संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र, पंतनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे. फोटोच्या माध्यमातून पंतनं एक मोठा इशारा दिला आहे की, तो आयपीएलची 5 वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जमध्ये (CSK) सामील होऊ शकतो.
पंतनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये पंत भारतीय चित्रपटाचे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांची पोज कॉपी करताना दिसत आहेत. पंतनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला रजनीकांत दिसत आहे. चित्राच्या कॅप्शनमध्ये पंतने ‘थलाइवा’ असं लिहिलं आहे. अनेक चाहते पंतच्या या कॅप्शनला ‘थाला’ महेंद्रसिंग धोनीच्या नावाशी जोडत आहेत.
View this post on Instagram
पंतचं वय संध्या 26 वर्ष 322 दिवस आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2017ला पदार्पण केलं होतं. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 33 कसोटी, 31 एकदिवसीय आणि 76 टी20 सामने खेळले आहेत. 33 कसोटी सामन्यात त्यानं 43.67च्या सरासरीनं 2,271 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्यानं 11 अर्धशतक आणि 5 शतक झळकावली आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 राहिली आहे.
31 एकदिवसीय सामन्यात त्यानं 33.50च्या सरासरीनं आणि 106.21च्या स्ट्राईक रेटनं 871 धावा केल्या आहेत, तर 5 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 125 राहिली आहे. पंतनं 76 टी20 सामन्यात 127.26च्या स्ट्राईक रेटनं आणि 23.25च्या सरासरीनं 1,209 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 अर्धशतक आहेत. टी20 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 65 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या बत्या गुल! शून्यवर बाद होताच सोशल मीडियावर ठरला बळीचा बकरा
“मी अँडरसन सारखा नाही जो 40…” ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य!
विराट कोहली खरंच बदलला आहे का? पियुष चावलाचा मोठा गाैप्यस्फोट!