जकार्ता| इंडोनेशिया मास्टर्स २०२२च्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपापल्या फेरी जिंकत उत्तम सुरूवात केली आहे. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूष एकेरीचे पहिले सामने जिंकले आहे.
विश्वचषक कांस्यपदक विजेत्या सेनने थॉमस कपमधील फॉर्म कायम राखत पुढच्या फेरीत आपली आगेकुच सुरूच ठेवली आहे. त्याने जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या रॅस्मस गॅमकेचा २१-१८, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
गॅमके विरुद्ध पहिल्यांदाच खेळणारा सेन या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये ०-३ असा मागे होता. त्याने ९-६ असा फरक आणत उत्तम खेळ केला. तर याच फॉर्ममध्ये आक्रमकपणे पुढे खेळत त्याने सरळ सहा पॉइंट्स जिंकून पहिला सेट आपल्या नावे केला आहे.
दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही बॅडमिंटनपटूमध्ये चढाओढ सुरू झाली. सेट १३-१२ असा असताना सेनने पुन्हा एकदा कुरघोडी करत हा सेट जिंकत पुढच्या फेरीत धडक मारली आहे.
तसेच दुखापतीतून सावरलेला समीर वर्मा याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला इंडोनेशियाच्या चिको औरा वारडोयोने १७-२१, १५-२१ असे पराभूत केले.
या स्पर्धेत दोन वेळची ऑलम्पिक विजेता सिंधूची गाठ इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का टूनजुंगशी पडणार आहे. तसेच मिश्र दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा आणि बी सुमित रेड्डी यांची चीनत्या झेंग सी वेई आणि हुआंग या कियोंग यांच्यात होणार आहे.
नुकतेच भारतीय संघाने थॉमस कप जिंकला आहे. यावेळी त्यांनी १४वेळेच्या चॅम्पियन संघ इंडोनेशियाला ३-०ने पराभूत केले होते. यामध्ये के श्रीकांत, प्रणोय एचएस बरोबरच सेनचाही समावेश होता.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेलो इंडिया यूथ गेम्स | गोल्ड मेडल्स विजयाच्या शर्यतीत हरियाणाची आगेकूच, महाराष्ट्र ‘या’ स्थानी
सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला
‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटर्सही खेळलेत आयपीएल, जाणून घ्या एका क्लिकवर