बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने बंगाल क्रिकेट असोशिएशनच्या इनडोअर सराव स्टेडियमचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या इनडोअर स्टेडियममध्ये उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील या स्टेडियमच्या फोटोंना पाहून अनेकांना ते एखादे फाइव्ह स्टार हॉटेल असल्याचा भास होऊ शकतो.
खरे तर, बंगाल क्रिकेट असोशिएशनने त्यांच्या खेळाडूंना सरावासाठी हे शानदार इनडोअर स्टेडियम बनवले आहे. इथे खेळाडूंसाठी मोठ-मोठ्या तांत्रिक सुविधांसह एक शानदार स्विमिंगपूल देखील आहे. त्यांच्यासाठी एक मोठे जिम आहे, ज्यात चांगल्या प्रतिच्या (क्वालिटी) मशीनही आहेत.
Some more pictures pic.twitter.com/Npc9zkjIE9
— Sourav Ganguly (@SGanguly99) March 14, 2020
तसेच, या स्टेडियममध्ये खेळाडूंच्या विश्रामाची पुर्णपणे सोय करण्यात आली आहे. याशिवाय, येथे इतरही वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.
गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होण्यापुर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्याने बराच काळ या असोसिएशनसाठी काम केले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोत त्याचे, भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंग आणि इतरही अनेक खेळाडूंचे फोटो मैदानाच्या एका बाजूला लावलेले दिसत आहेत. या फोटोंच्या आणि खेळपट्टीमध्ये एक नेट लावलेले आहे.
याव्यतिरिक्त स्टेडियमच्या बाहेर एका भिंतीवरती खूप सारे फोटो लावलेले आहेत. यात अनेक माजी महिला व पुरुष क्रिकेटपटूंच्या फोटोंचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या इनडोअर क्रिकेट स्टेडियमचा वापर केवळ स्थानिक खेळाडूच नव्हे तर विरुद्ध संघातील खेळाडूही करू शकतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
– भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा हा एकमेव क्रिकेटपटू…
– संपुर्ण माहिती: पुढील १ महिन्यात क्रिकेटमध्ये नक्की कोणत्या…
– या दोन टीम इंडियाच्या गोलंदाजांचं नाव जरी ऐकलं तरी फिंच…