पुणे: इंडस इंटरनॅशनल स्कुलच्या नऊ विद्यार्थ्यांनी जपान येथिल सर्वात उंच 3,776 मीटर उंचीचे माउंट फुजी हे शिखर यशस्वीरीत्या सर केले. माउंट फुजी हे जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर तसेच जिवंत ज्वालामुखी आहे. 8सप्टेंबरला चढायला सुरुवात केली आणि 9सप्टेंबरला हे शिखर या विद्यार्थ्यांनी सर केले.
ही चढाई इंडस स्कुल ऑफ लिडरशीपचे लिडरशीप ट्रेनर मोहीत तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हैद्राबाद, बंगलोर आणि पुणे येथील इंडस इंटरनॅशनल स्कुलच्या 8, 9 आणि 10 ग्रेड असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून ही पर्वतारोहण मोहीम सुरू केली. तसेच, पीक टु लीड या कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये आयुष्यात येणा-या समस्यांना समर्थपणे व धैर्यांने तोंड देता यावे यासाठी मार्गदर्शन केले जाते.
नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी माउंट फुजी शिखरापर्यंत पोहोचले. यामध्ये ग्रेड 9 इंडस इंटरनॅशनल स्कुल, पुण्याचा ईशान सुभेदार , ग्रेड 10 इंडस इंटरनॅशनल स्कुल, हैद्राबादचा विघ्नेश कन्नन, ग्रेड 8 इंडस इंटरनॅशनल स्कुल, हैद्राबादचा अरविंद कन्नन, ग्रेड 9 इंडस इंटरनॅशनल स्कुल, हैद्राबादचा उमंग सिंघानीया व ग्रेड 8 इंडस इंटरनॅशनल स्कुल, बेंगलोरचा सीझर अफोंसा हुरेत यांनी शिखराला गवसणी घातली.
शिखर यशस्वीरीत्या सर केल्यानंतर ईशान सुभेदार म्हणाला की, “मी माउंट फुजीच्या शिखरावर पोहचण्याचा निर्धार केला होता. हे शिखर सर करताना आपण हे करू शकु का? याबाबत कधी शंका निर्माण झाली, तर आमचे प्रशिक्षक मार्गदर्शक आमचा आत्मविश्वास वाढवत असे. यशस्वी चढाई करणे हे केवळ प्रयत्न आणि शिस्तीवर अवलंबुन असते, असे मला वाटते. माझे शिखर सर करण्याचे स्वप्न सत्यात उतरले असून माणसाच्या आयुष्याचे मुल्य कळण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे. माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी हे शिखर यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
इंडस स्कुल ऑफ लिडरशिपचे संचालक कर्नल सत्या राव म्हणाले की, “पर्वतारोही हा एक आध्यात्मिक खेळ आहे जो सर्वोत्तम नेतृत्वाचे धडेशिकवतो आणि आंतरिक जगावर विजय मिळवितो. चढाई दरम्यान विद्यार्थ्यांना विपरीत परिस्थितींना तोंड द्यावे लागले. हवामान उग्र होते, अंदाज लावता येण्यासारखे नव्हते, अत्यंत थंड वातावरण होते. परंतु त्यांनी या सर्व विपरीत परिस्थितींवर मात करत त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले व अखेरीस शिखरावर पोहोचलो. लिडशिप ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये आधी तुम्हाला स्वतःला लीड करायचे असते आणि नंतर इतरांना मार्गदर्शन करायचे असते. या मोहीमेतून आम्हांला खुप काही शिकायला मिळाले.
माउंट फुजी या यशस्वी मोहीमेनंतर इंडस स्कुल ऑफ लिडरशिप विद्यार्थ्यांना माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. माउंट एव्हरेस्ट सर करणे हा पिक टु लिड कार्यक्रमाचा भाग आहे. त्यासाठी प्रशिक्षण, शिस्त, परिश्रम आणि दृढनिश्चय यांची प्रचंड आवश्यकता असते. यासाठी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांवर पुर्ण विश्वास असून ते हे नव्हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करतील, असे इंडस स्कुल ऑफ लिडरशिपचे लिडरशिप ट्रेनर मोहीत तोमर यांनी सांगीतले.
दोन वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे कर्नल नीरज राणा संपूर्ण मोहीम आयोजित केली असून त्यांना हर्षाली वर्तक सहकार्य लाभले आहे.