---Advertisement---

INDvAUS: क्रिकेटच्या मैदानातही झळकले ’50 खोके एकदम ओके’चे बॅनर, वाचा सविस्तर

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) दुसरा टी20 सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि विजय देखील मिळवला. दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयानंतर मालिकेत भारतीय संघाने 1-1 अशी बरोबरी देखील केली आहे. कर्णधार रोहित शर्मा याने विजयासाठी मोलाचे योगदान दिले, तर शेवटच्या षटकात चौकार आणि षटकार मारल्यानंतर दिनेश कार्तिकवर देखील कौतुकाचा वर्षाव झाला. याच सामन्यातील एक बॅनर चांगलेच व्हायरल झाले आहे.

या सामन्यात काही क्रिकेट रसिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटविरोधातील 50 खोकेची घोषणा असलेले बॅनर फडकावले. या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, यामुळे मैदानावर देखील ’50 खोके एकदम ओके’चा नारा गुंजला. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा टी-20 सामना नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडला. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी आठ-आठ षटके खेळण्याची संधी दिली गेली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली, पण ऑस्ट्रेलियन संघाने जे करायचे ते केलेचं. आठ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावून 90 धावा केल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेले 91 धावांचे लक्ष्य भारताने चार चेंडू शिल्लक ठेवून केला. भारताला विजय मिळवून देण्यासाठी  भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोघांचे योगदान सर्वात महत्वाचे होते. रोहितने अवघ्या 20 चेंडूत 46 धावा केल्या, तर कार्तिकने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा केल्या. गोलंदाजांमध्ये अक्षर पटेलने 2 तर जसप्रीत बुमराह याने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियासाठी विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेड याने 20 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. तर त्यांचा फिरकी गोलंदाज एडम झंपाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना मालिका विजयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
झूलनला ‘परफेक्ट फेअरवेल’! सहकारी खेळाडूंनी खांद्यावर घेत दिली मानवंदना; पाहा व्हिडिओ
थोडक्यात वाचला हॅरी ब्रुक! हेलमेटच्या ग्रीलमध्ये अडकला चेंडू, पाक गोलंदाजाची रिएक्शन व्हायरल
आता अर्जुन तेंडुलकरचे प्रदर्शन सुधारणार! सचिनने ‘या’ कडक प्रशिक्षकांच्या हवाली केला मुलगा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---