---Advertisement---

कांगारू रोखणार टीम इंडियाचा विजयरथ? चेन्नईत रंगणार निर्णायक सामना, अशी असू शकते प्लेईंग 11

On: बुधवार, मार्च 22, 2023 12:08 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा तिसरा व अखेरचा वनडे सामना मंगळवारी (22 मार्च) खेळला जाईल. मालिका आपल्या नावे करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील. चेन्नई येथील एमए चिदंबरम म्हणजे चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतात मागील पाच वर्षापासून वनडे मालिकेत पराभूत न होण्याचा विक्रम भारतीय संघ अबाधित राखू शकतो.

भारतीय संघाने मुंबई येथे झालेला मालिकेतील पहिला सामना एकतर्फी आपल्या नावे केला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत भारतीय संघाला दहा गड्यांनी मात दिली.‌ त्यामुळे हा अखेरचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्टा करतील.

भारतीय संघाने मागील पाच वर्षात घरच्या मैदानावर एकही वनडे मालिका गमावली नाही. घरच्या मैदानावर झालेल्या मागील सातही वनडे मालिका भारतीय संघ जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. भारताला अखेरच्या वेळी वनडे मालिकेत पराभूत करण्याची किमया देखील ऑस्ट्रेलिया संघाने केली होती. 2018 साली झालेल्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-2‌ असा विजय संपादन केलेला. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया संघाचा असेल.

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नई येथील हवामान काहीसे ढगाळ असले तरी याचा फारसा परिणाम सामन्यावर होणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया: ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ऍडम झंपा.

(INDvAUS Chennai ODI Australia Chance To Break Team India Chain Of 7 Consecutive ODI Series Win At Home)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत होताच खचली कर्णधार स्मृती मंधाना; म्हणाली, ‘….आमचा संघ खराब आहे’
भारतात जाऊन ‘हा’ संघ जिंकणार विश्वचषक, माजी दिग्गजाच्या मते फक्त टीम इंडियाचे असेल आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---