भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा तिसरा व अखेरचा वनडे सामना मंगळवारी (22 मार्च) खेळला जात आहे. मालिका आपल्या नावे करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. चेन्नई येथील एमए चिदंबरम म्हणजे चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update from Chennai 🚨
Australia have elected to bat against #TeamIndia in the third & final #INDvAUS ODI.
Follow the match ▶️ https://t.co/eNLPoZpkqi @mastercardindia pic.twitter.com/JAjU6ttaJh
— BCCI (@BCCI) March 22, 2023
उभय संघातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला होता. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील भारतीय संघाचा दबदबा राहिला. मुंबई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत भारतावर एकतर्फी मात केली. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने दणदणीत विजय साजरा केला.
मालिका नावे करण्यासाठी दोन्ही संघांना या सामन्यात विजय अनिवार्य आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आपल्या संघात दोन बदल केले. प्रकृती ठीक नसल्याने अष्टपैलू कॅमेरून ग्रीन या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याच्या जागी अनुभवी डेव्हिड वॉर्नर याला संघात स्थान देण्यात आले. तर, वेगवान गोलंदाज नॅथन एलिसच्या जागी फिरकीपटू ऍश्टन एगरची निवड केली गेली. भारतीय संघाने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया: ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शॉन ऍबॉट, मिचेल स्टार्क, ऍश्टन एगर, ऍडम झंपा.
(INDvAUS Chennai ODI Australia Won Toss And Elected Bat First)