भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तासानंतर सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. केवळ आठ षटकांच्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात तब्बल तीन महिन्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुनरागमन केले.
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against Australia in the second #INDvAUS T20I.
Follow the match ▶️ https://t.co/LyNJTtkxVv pic.twitter.com/aZnXCQCl4a
— BCCI (@BCCI) September 23, 2022
नागपूर येथे मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. त्यामुळे नागपूर येथे पोहोचलेल्या दोन्ही संघांना सराव करता आला नव्हता. सामन्या दिवशी पाऊस पडला नसला तरी सलग तीन दिवसाच्या पावसामुळे मैदान खेळण्यासाठी अद्याप योग्य नाही. सामना नियोजित वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होणार होता. मात्र, 7 वाजता दोन्ही पंचांनी मैदानाचे निरीक्षण केले. त्यानंतर आता पुढील निरीक्षण 8 वाजता झाले. 8 वाजून 45 मिनिटांनी झालेल्या अखेरच्या निरीक्षणानंतर 9.30 मिनिटांनी सामना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
केवळ आठ शतकांच्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले गेले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांच्या जागी रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांना संधी दिली गेली. बुमराह जुलै महिन्या नंतर प्रथमच भारतासाठी खेळेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने जखमी जोस इंग्लिस व नॅथन एलिस यांच्या ऐवजी डॅनियल सॅम्स आणि सीन अबॉट या दोन्ही अष्टपैलूंना संधी दिली गेली.
भारत (प्लेइंग इलेव्हन):
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रिषभ पंत, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
2ND T20I. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, R Pant (wk), H Pandya, D Karthik, A Patel, H Patel, Y Chahal, J Bumrah. https://t.co/PMFUaJD3HG #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 23, 2022
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन)-
ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, सीन अबॉट, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड