भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS)दुसरा टी20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपूर येथे खेळला गेला. खराब मैदानामुळे तब्बल अडीच तास उशिराने सामना सुरू झाला. प्रत्येकी आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 91धावांचे आव्हान चार चेंडू शिल्लक राखत पार केले. अखेरच्या षटकात विजयासाठी नऊ धावांचे आव्हान असताना दिनेश कार्तिकने मैदानात येतात एक षटकार आणि एक चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, एका बाजूने अखेरपर्यंत नाबाद राहत रोहित शर्मा याने विजयाचा खरा पाया रचला. यादरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
भारताचा कर्णधार-सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला षटकार मारत विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूत षटकार खेचत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 11 षटकार हे पहिल्याच षटकात मारले आहेत. तर बाकी भारतीय खेळाडूंनी मिळून आंतरराष्ट्रीय टी20च्या पहिल्या षटकात 11 षटकार मारले आहेत.
रोहितने या सामन्यात 20 चेंडूत नाबाद 46 धावा करताना 4 चौकार आणि 4 षटकार फटकारले आहेत. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमही आपल्या नावावर केला आहे. त्याच्या नावे आता 176 षटकार जमा झाले असून, हा विक्रम करताना त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल याला मागे टाकले आहे. त्याच्या नावे आतापर्यंत 172 षटकारांची नोंद आहे. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याचा क्रमांक लागतो. गेलने आपल्या कारकीर्दीत 124 षटकार लगावले होते.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ऍरॉन फिंचच्या 31 व मॅथ्यू वेडच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा व केएल राहुल यांनी आक्रमक सुरुवात दिली. मात्र, एकापाठोपाठ सलग चार फलंदाज नियमित अंतराने बाद झाल्याने भारतीय संघ काहीच अडचणी सापडला होता. कर्णधार रोहित शर्मा एका बाजूने उत्तम फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार:
रोहित शर्मा- 11
इतर खेळाडू – 11
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रॉजर फेडररचा इमोशनल बाय-बाय! राफेल नदाल, नोवाक जोकोविच यांना देखील अश्रू अनावर
ज्युनियर तेंडुलकर झाला 23 वर्षांचा; जाणून घ्या बर्थ डे बॉयच्या आयुष्यातील मजेशीर किस्से