इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी(15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी केली.
त्याने भारताकडून शुक्रवारी पहिल्या डावात खेळताना 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले. शुक्रवारीच्या खेळानंतर मयंक स्टेडियममधील खास चाहत्यांना भेटण्यास गेला होता.
https://www.instagram.com/p/B441I42AtG2/
मयंकच्या फलंदाजीचा दिवसभर स्टँडमध्ये बसून आनंद घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे मयंक शुक्रवारचा खेळ संपल्यानंतर गेला.
हे विद्यार्थी बोलू आणि ऐकू शकत नव्हते, परंतु त्यांना दिवसभर मयंकच्या बॅटची भाषा समजली होती. जेव्हा त्यांचा हीरो मयंक या चाहत्यांना भेटण्यासाठी मैदानात पोहोचला तेव्हा या सर्व विद्यार्थ्यांचा दिवस आणखी खास बनला.
या दरम्यान मयंकने विद्यार्थ्यांसोबत काही सेल्फीही घेतल्या. मयंकला पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून येत होता.
भारताने हा सामना आज(16 नोव्हेंबर) एक डाव आणि 130 धावांनी जिंकला आहे.






