भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (9 ऑक्टोबर) खेळला जात आहे. जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळल्या गेलेल्या या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात पाहुण्या संघाने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेने रीझा हेंड्रिक्स आणि एडन मारक्रम यांच्या शतकीय भागीदारीच्या जोरावर 50 षटकात 7 विकेट्स गमावत 278 धावसंख्या उभारली. दोघांनी यावेळी अर्धशतके केली आहेत.
फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला मोहम्मद सिराज आणि नवख्या शाहबाज अहमद (Shahbaj Ahmed) यांनी सुरूवातीलाच धक्के दिले. क्विंटन डी कॉक याला सिराजने 5 धावांवर आणि जानेमन मलान याला अहमदने 25 धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रीझा हेंड्रिक्स (Reeza Hendricks) याने एडन मारक्रम याच्यासोबत धावफलक हलता ठेवला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 129 चेंडूत 129 धावांची भागीदारी केली. रीझा हा 74 धावा करत बाद झाला. तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेने समाधानकारक धावसंख्या उभारली होती. तो बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 150 धावांचा टप्पा गाठला होता. हेनरीच क्लासेनचा अडसर कुलदीप यादवने दूर केला. क्लासेनने 30 धावा केल्या.
WHAT. A. CATCH! 👍 👍@mdsirajofficial takes a stunner to dismiss Heinrich Klaasen. 👌 👌 #TeamIndia
South Africa lose their 4th wicket.
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKiAHZ
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia. pic.twitter.com/Yy8NrpdXGm
— BCCI (@BCCI) October 9, 2022
हेंड्रिक्सनंतर मारक्रम आणि क्लासेन यांनी सामना सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचली. मारक्रमला वॉशिंग्टन सुंदर याने कर्णधार शिखर धवन याच्याकरवी झेलबाद केले. मारक्रम 79 धावा करत बाद झाला. त्यानंतर वेन पार्नेल आणि डेविड मिलर यांच्यात चांगली भागीदारी होत असताना पुन्हा एकदा शार्दुल ठाकुर भारताच्या मदतीला धावून आला आहे. त्याने पार्नेलला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करत ही जोडी तोडली. या जोडीने 41 धावांची भागीदारी रचली. तसेच मिलर 35 धावा करत नाबाद राहिला.
गोलंदाजीत अहमदने पहिल्याच सामन्यात त्याचे 10 षटके पूर्ण केली, मात्र त्याने त्यासाठी 54 धावा खर्च केल्या. त्याशिवाय सिराजने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटच्या षटकात कर्णधार केशव महाराज याला 5 धावांवर असताना त्रिफळाचीत केले. ही त्याची सामन्यातील तिसरी विकेट ठरली. सिराजने 10 षटकात 38 धावा देत एक निर्धाव षटकही टाकले आहे. संघपुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर याने 9 षटकात 60 धावा देत 1 विकेट घेतली. त्याचबरोबर शार्दुल ठाकुर यानेही एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 36 धावा दिल्या.
रांचीमध्ये भारत 2014नंतर वनडे जिंकला नसला तरी या मालिकेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी भारताच्या सलामीवीरांना चांगली सुरूवात करून द्यावी लागणार आहे. कारण दक्षिण आफ्रिका पहिला सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा पुढे आहे. यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाज कसा लक्ष्याचा पाठलाग करतात हे पाहण्यासारखे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कमबॅक असावं तर असं! ऑस्ट्रेलियाला चोपत बटलरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थाटात पुनरागमन
सिराजच्या वेगापुढे डी कॉकने टेकले गुडघे, पापणी लवण्याच्या आतच उडवल्या दांड्या; व्हिडिओ पाहाच