भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मंगळवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली येथे मालिकेतील तिसरा सामना खेळला गेला. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला आहे. दक्षिण आफ्रिका 27.1 षटकातच 99 धावांवर सर्वबाद झाला. यामुळे भारतासमोर मालिका जिंकण्यासाठी 100 धावांचे आव्हान होते. या सामन्यात कुलदीप यादव याची गोलंदाजी प्रभावशाली ठरली आहे.
भारताच्या मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पाहुण्या संघाला सुरूवातीलाच धक्के दिले. सुंदरने क्विंटन डी कॉक याला 6 धावांवरच आवेश खानकरवी झेलबाद केले. सिराजने जानेमन मलान याचा अडसर दूर केला. मलानला त्याने सबस्टिट्यूड रवि बिश्नोईकरवी झेलबाद 3 धावांवरच बाद केले. नवख्या शाहबाज अहमद याने त्याच्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यातही विकेट घेतली. एडन मार्क्रम (9) याने विकेटकीपर संजू सॅमसनकडे झेल देत अहमदच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली.
सिराज-सुंदर यांच्यानंतर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आला. त्याने तर आधीच वाईट अवस्थेत असलेल्या दक्षिण आफ्रिकेची स्थिती आणखी खिळखिळी केली. त्याने या सामन्यात 4.1 षटके टाकताना 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याने एक षटक निर्धावही टाकले.
कुलदीपची वनडेतील आकडेवारी पाहिली तर त्याने वेस्ट इंडिज नंतर दक्षिण आफ्रिकेला अधिक त्रास दिला आहे. जून 2017मध्ये भारताच्या वनडे संघात पदार्पण करणाऱ्या या फिरकीपटूने आतापर्यंत 71 सामन्यात 114 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 25 धावांवर 6 विकेट्स अशी आहे. ही कामगिरी त्याने 2018मध्ये इंग्लंड विरुद्ध नॉटींगघममध्ये केली होती.
कुलदीपने सर्वाधिक वनडे विकेट्स वेस्ट इंडिज विरुद्ध घेतल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध 16 सामन्यात 4.94 च्या इकॉनॉमी रेटने 26 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2018-2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 सामन्यात 4.72 च्या इकॉनॉमी रेटने 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी त्याने नुकत्याच झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात नोंदवली आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीत पाचवेळा चार किंवा चारपेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यातील तीन वेळा ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच केली आहे.
4⃣.1⃣ Overs
1⃣ Maiden
1⃣8⃣ Runs
4⃣ WicketsSit back & relive @imkuldeep18's bowling brilliance 🎥 🔽 #TeamIndia | #INDvSA | @mastercardindia https://t.co/rid4SwNkKL
— BCCI (@BCCI) October 11, 2022
वनडेमध्ये कुलदीप यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध –
10 – डाव
24 – विकेट्स
4/18 – सर्वोत्तम कामगिरी
3 वेळा – चार किंवा चारपेक्षा अधिक विकेट्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितचा संघ टी20 वर्ल्डकपनंतर ‘या’ संघाच्या दौऱ्यावर जाणार, पाहा संपूर्ण स्केड्युल
AUSvENG: किती चिडी गेम खेळणार ऑस्ट्रेलिया! ऍरॉन फिंचची थेट अंपायरला शिवीगाळ