दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित वनडे मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ निवड समितीने दीपक चाहर याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याची निवड केली आहे. इंदोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यानंतर चाहरला पाठीची दुखापत झाल्याने आणि लखनऊमधील पहिल्या वनडे सामन्यात तो भारताच्या अंतिम अकरामध्ये सहभागी झाला नव्हता.
दीपक चाहर (Deepak Chahar) आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) जाणार आहे आणि तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवेल, अशी माहिती बीसीसीआयने निवदेन जाहीर करत दिली आहे.
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने भारताकडून शेवटचा सामना फेब्रुवारीमध्ये खेळला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्या वनडे सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी केली होती. ज्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच त्याने भारताकडून आतापर्यंत 4 वनडे सामने खेळताना 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 4 कसोटी सामन्यामध्ये 6 विकेट्स घेत 265 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 25 विकेट्स घेतल्या आहेत.
🚨 NEWS 🚨: Washington Sundar replaces Deepak Chahar in ODI squad. #TeamIndia | #INDvSA
More Details 🔽https://t.co/uBidugMgK4
— BCCI (@BCCI) October 8, 2022
या मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. लखनऊ येथे झालेला पहिला सामना भारताने अवघ्या 9 धावांनी गमावला होता. यामुळे भारताची चांगलीच निराशा झाली होती.
भारताचा एक संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला असून रोहित शर्मा त्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन भारताचे कर्णधारपद भुषवित आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळली गेलेली वनडे मालिका जिंकली आहे.
तसेच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा वनडे सामना 9 ऑक्टोबरला रांची येथे खेळला जाणार आहे आणि 11 ऑक्टोबरला दिल्ली येथे मालिकेतील अंतिम वनडे सामना खेळणार आहे.
भारताचा वनडे संघ: शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गजब बेइज्जती! विराटविरुद्ध तोंडातून शब्द काढणाऱ्या रमीज राजांची पाकिस्तानी दिग्गजाने उडवली खिल्ली
टी20 विश्वचषकापूर्वीच टीम इंडियाची ताकद झाली डबल, ताफ्यात सामील झाले ‘हे’ दोन घातक गोलंदाज