ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरूष संघाने भारताच्या दौऱ्याची (INDvsAUS) चांगली सुरूवात केली आहे. मोहाली येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यांत त्यांनी यजमान संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने भारताने दिलेल्या 209 लक्ष्याचा पाठलाग 4 चेंडू आणि 4 विकेट्स शिल्लक राखत जिंकला. या विजयामध्ये मॅथ्यू वेड बरोबर आणखी एका खेळाडूने संघाला विजयापर्यंत पोहचवण्यास महत्वाची भुमिका पार पाडली. त्या खेळाडूने त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा झाला, हे विधान केले आहे.
सिंगापूर येथे जन्मलेल्या टीम डेविड (Tim David) याने पहिला सामन्यानंतर सांगितले की, ‘त्याला आयपीएलमध्ये खेळल्याने त्याच्या अनुभव कामी आला. भारताच्या खेळपट्टीवर पहिल्या सामन्यात दबावाच्या स्थितीत शांत राहुन फलंदाजी करणे सोपे झाले.’
डेविडने मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला मुंबईने आपल्या संघात घेतले. यावर्षी त्याने 8 आयपीएलचे सामने खेळले. त्याने एका मुलाखतीत म्हटले, “भारतात खेळण्याचा अनुभव असल्याने मला त्याच्या फायदा पहिल्या टी20मध्ये झाला. मला माहित होते की आम्ही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करणार.”
डेविडने भारताविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 14 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत 18 धावा केल्या. त्याने वेडसोबत 30 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. हीच भागीदारी भारताच्या पराभवाचे कारण ठरली. डेविडने त्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील जबाबदारीबाबतही बोलताना म्हटले, “मला मधल्या फळीत फलंदाजी करायची असते, याचा अर्थ मला अधिक चेंडू खेळायला मिळणार नाही, माझ्यावर फिनिशरची जबाबदारी आहे आणि त्याच हिशोबाने मी चांगले शॉट्स खेळणार.”
या मालिकेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी20 सामने खेळले जाणार आहे. यातच ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकल्याने त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यातील दुसरा सामना 23 सप्टेंबरला नागपूर आणि तिसरा सामना 25 सप्टेंबरला हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिन नावाचे वादळ धडकले इंग्लंडला, 24 वर्षानंतर तेंडूलकरच्या ‘त्या’ शॉटने चाहत्यांना झाली शारजाहची आठवण
झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा