इंदोर । पहिल्या दोनही सामन्यात ऑस्ट्रेलिया संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल और कुलदीप यादवची जोडी तिसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्सी संघासाठी अवघड जाणार आहे. कारण या मैदानाच्या क्यूरेटरच्या म्हणण्यानुसार खळपट्टीकडून केवळ रिस्ट स्पिनर्सलाच मदत मिळू शकते.
भारतीय गोलंदाजांमध्ये कधी नाही ते आजकल दोन रिस्ट स्पिनर्स संघात आहेत आणि त्यात ते चांगली कामगिरी करत आहेत. दोन्ही सामन्यात मिळून या दोंघांनी प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या आहेत. या दोन गोलंदाजाच्या गोलंदाजीवरच भारतीय संघाने दोंन्ही सामन्यात विजय मिळवले आहेत. भारत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० असा आघाडीवर आहे.
मध्यप्रदेश क्रिकेट असोशिएशन (एमपीसीए) चे क्यूरेटर समंदर सिंह चौहान म्हणतात, ‘‘हे मैदान फलंदाजांची अनुकूल आहे.माहित नाही किती धावा होतील परंतु मोठ्या धावांचा हा सामना होईल. शिवाय गोलंदाजांसाठीही येथे मोठी संधी आहे. ”
परंतु ते पुढे म्हणतात की या मैदानावर पारंपरीक फिरकी गोलंदाजांपेक्षा रिस्ट स्पिनर्सला जास्त मदत मिळेल.
” भारताकडे एक गोष्ट चांगली आहे की भारताकडे दोन रिस्ट स्पिनर आहे. कारण या मैदानावर पारंपरिक फिरकी गोलंदाजांना मदत मिळायची शक्यता खूप कमी आहे. ”
यदाकदाचित आपणास माहित नसेल तर
# तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
# याच मैदानावर वीरेंद्र सेहवागने २०११ साली विंडीज विरुद्ध २१९ धावा केल्या होत्या.
# या मैदानावर अंदाजे ३०,००० प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
# या मैदानावर आजपर्यंत एकूण ४ वनडे सामने तर एक कसोटी सामना झाला आहे.