टी-२० क्रिकेट मध्ये फलंदाजांनी ठोकलेले गगनचुंबी चौकार, षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळतात. टी-२० मध्ये फलंदाजांचा प्रयत्न असतो की मोठे फटके मारून धावा काढणे. तसेच, आपल्या संघाला चांगल्या धावसंंख्येपर्यंत पोहोचवणे. काही वेळा फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात बाद होतात. परंतु टी-२० हा असा क्रिकेट प्रकार आहे, जिथे फलंदाजांना जोखीम पत्करून अधिक धावा काढण्यावर लक्ष द्यावे लागते. टी-२० मध्ये फलंदाजाला एका सामन्यात १२० चेंडू मिळतात. त्यात त्यांना आपल्या संघाला विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त धावा कराव्या लागतात.
भारत ऑस्ट्रेलिया विरोधातील टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजाकडून खूप वेळा जबरदस्त पारी खेळताना पाहायला मिळाली आहे. या पारीमध्ये फलंदाजाने चौकार षटकार मारताना दिसून आलेले आहेत. ४ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलिया विरोधात चौकार-षटकारची जबरदस्त खेळी करणारे दिग्गज भारतीय खेळाडू संघात आहेत. या टी-२० मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फलंदाजीतून चौकार षटकारची आतिशबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच सामन्यात चौकार षटकारने सर्वात ज्यादा धावा काढणारे तीन भारतीय खेळाडू-
१. शिखर धवन
ऑस्ट्रेलिया विरोधात २०१८ला ब्रिसबेन मैदानात टी २० सामन्यात धवनने स्फोटक फलंदाजी केली होती. धवनने या सामन्यात ४२ चेंडूत १८० च्या सरासरीने ७६ धावाची शानदार पारी केली. शिखर धवनने या सामन्यात चौकार षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या होत्या. धवनचे या सामन्यात १० चौकार व २ षटकार होते. ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत धवनकडून अशा प्रदर्शनाची अपेक्षा भारतीय संघाला असेल.
२. रोहित शर्मा
सन २०१० मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकामधील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजाचे खराब प्रदर्शन दिसून आले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८५ धावांच्या पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची एकापाठोपाठ विकेट जात होती. त्यामध्ये रोहित शर्मा सोडले, तर दुसरे कोणतेही खेळाडू मोठी पारी खेळले नाहीत. या सामन्यात रोहितने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावांची जबरदस्त पारी केली. रोहितने आपल्या या पारीत ४ चौकार आणि ६ षटकार ठोकले होते. रोहितच्या या शानदार खेळीनंतरही भारताला या सामन्यात ४९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
३. युवराज सिंग
माजी भारतीय खेळाडू युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका सामन्यात चौकार षटकारांच्या मदतीने सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. युवराजने २०१३ साली राजकोटच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरोधात टी-२० सामन्यात ३५ चेंडूत ७७ धावांची नाबाद खेळी केली होती. युवराजने या आपल्या खेळीत ८ चौकार व ५ षटकार मारले होते. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता.
ट्रेंडिंग लेख-
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी