भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. यांपैकी वनडे आणि टी२० मालिकेसाठी सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. असे असले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची वनडे आकडेवारी खूप चांगली आहे.
ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित सर्वांच्या पुढे आहे. रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना सर्वाधिक ९९० धावा केल्या होत्या. यात त्याने कर्णधार विराट कोहलीसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७४० धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी आहे. धोनीने ६८४ धावा केल्या आहेत.
विराटबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना वनडेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ६२९ धावा केल्या आहेत.
एकूण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याबद्दल बोलायचं झालं, तर सचिन अव्वलस्थानी आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ सामने खेळताना ३०७७ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने ४० वनडे सामन्यात खेळताना २२०८ धावा केल्या आहेत, तर विराट तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० वनडे सामने खेळताना १९१० धावा केल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर धोनी असून त्याने ५५ वनडे सामने खेळताना १६६० धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारे टॉप ४ भारतीय फलंदाज
९९० धावा- रोहित शर्मा
७४० धावा- सचिन तेंडुलकर
६८४ धावा- एमएस धोनी
६२९ धावा- विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू भासू देणार नाही रोहितची कमतरता; ऑस्ट्रेलियन अष्टपैलूचे मत
‘विराट कोहलीची विकेट महत्त्वाची’, ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य