भारतीय पुरूष क्रिकेट संघाने रविवारी (25 सप्टेंबर)ऑस्ट्रेलियाला (INDvsAUS)6 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताकडून विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी उत्तम अर्धशतकी खेळी केल्या. विराटने 63 आणि सूर्यकुमारने 69 धावा केल्या. याच खेळीने सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा भारताच्या महत्वाच्या खेळाडूंपैकी एक बनला आहे. तो आपल्या भन्नाट शॉट्ससाठी ओळखला जातो. त्याने यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा (Most T20 Runs For India in 2022) करण्याचा विक्रम केला आहे. हे करताना त्याने नेपाळच्या दीपेंद्र सिंग याला मागे टाकले आहे. तर तिसऱ्या स्थानावर चेक रिपब्लिकचा सबावून दाविजी आहे.
सूर्यकुमारने 2022मध्ये आतापर्यंत 20 सामन्यांत 37च्या सरासरीने 682 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा 8व्या स्थानावर आहे. त्याने 20 सामन्यांत 497 धावा केल्या आहेत. विराट कोहली याने 12 सामन्यात 433 धावा केल्याने तो 18व्या स्थानावर आहे.
त्याचबरोबर भारतासाठी आतापर्यंत एका वर्षात सर्वाधिक टी20 धावा करण्याचा विक्रम शिखर धवन (Shaikhar Dhawan) याच्या नावावर आहे. त्याने 2018मध्ये 689 धावा केल्या आहेत. त्यानंतर सूर्यकुमारचा क्रमांक लागतो. तर विराटने 2016मध्ये 641 धावा केल्याने तो तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच रोहितने 2018मध्ये 590, 2016मध्ये 497 धावा केल्या होत्या.
भारताकडून एकाच वर्षात सर्वाधिक टी20 धावांचा धवनचा विक्रम मोडण्यासाठी सूर्यकुमारला आठ धावांची आवश्यकता आहे. हे तो करूही शकतो, कारण भारत घरच्याच मैदानावर काही दिवसांमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमारला संघात निवडले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने पहिल्या दोन विकेट्स लवकरच गमावल्या. त्यांनतर विराट-सूर्यकुमार या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारताच्या विजयासाठी महत्वाची ठरली आहे.
And that's a brilliant 100-run partnership between this duo 🙌🙌
Live – https://t.co/xVrzo7lhd3 #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/2fVYTbRPiW
— BCCI (@BCCI) September 25, 2022
भारताकडून एकाच वर्षात सर्वाधिक टी20 धावा करणारे-
689 – शिखर धवन (2018)
682 – सूर्यकुमार यादव (2022)*
641 – विराट कोहली (2016)
590 – रोहित शर्मा (2018)
497 – रोहित शर्मा (2016)
497 – रोहित शर्मा (2022)*
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड अर्लट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भन्नाट खेळणाऱ्या किंग कोहलीचा विक्रम, ठरला केवळ दुसराच क्रिकेटपटू
टी-20 मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नुकसान! आयसीसी रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
मोहम्मद शमी यावेळीही संघाबाहेर! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उमरान मलिकची टिम इंडियात लागणार वर्णी