भारतीय फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिका निर्णायक सामन्यात उत्तम कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतके करत संघाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. हैद्राबाद येथे तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना रविवारी (25 सप्टेंबर) खेळला गेला. या सामन्यात स्फोटक खेळी करणारा सूर्यकुमार हा सामन्यापूर्वी आजारी होता, मात्र त्याने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी एक प्लॅनही केला होता. हे त्यानेच सांगितले आहे.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने तो आजारी होता, याचा खुलासा केला आहे. त्याने फिजिओला योग्य ती औषधे देण्यास सांगितली आणि तिसऱ्या सामन्यासाठी फिट करण्यासही सांगितले.
सूर्यकुमारने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली. यामध्ये सूर्यकुमारने 36 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 5 षटकार खेचले. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. यामुळे भारताने मालिकाही 2-1 अशी जिंकली.
या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अक्षर पटेल (Axar Patel) आणि सूर्यकुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये अक्षरने त्याला एक प्रश्न विचारला की, ‘फिजिओच्या रूममध्ये प्रत्येक जण तुझ्याबाबत का चर्चा करत होते आणि तू सकाळी तीन वाजता का उठला होता?’
अक्षरला उत्तर देताना सूर्यकुमार म्हणाला, “रात्री वातावरण बदलामुळे आणि प्रवास केल्याने मला तापही आला होता आणि पोटही दुखत होते, मात्र मला माहित होते सामना महत्वाचा आहे. त्यामुळेच मी माझ्या डॉक्टरांना आणि फिजिओला म्हटले जर विश्वचषकाचा अंतिम सामना असेल तर मी कसा रिऍक्ट करेल मी आजारपणामुळे संघाबाहेर नाही राहू शकत. यासाठी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे करा , मला औषधे किंवा इंजेक्शन द्या, मात्र मला संध्याकाळी होणाऱ्या सामन्यासाठी फिट करा. जेव्हा मी भारताच्या जर्सीमध्ये मैदानावर असतो तेव्हा एक वेगळीच भावना निर्माण होते.”
https://twitter.com/BCCI/status/1574247389388410881?s=20&t=Jo7fjbReSU55fwsfXSY_CA
सूर्यकुमार हा मागील काही टी20 मालिकांमध्ये भारतासाठी महत्वाचा फलंदाज ठरला आहे. तो यावर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. तसेच त्याला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 विश्वचषक 2022साठी संघात निवडले आहे. अशात त्याने फिट राहणे संघासाठी गरजेचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! तानिया भाटियाच्या हॉटेल रुममधून खासगी साहित्याची चोरी; लंडनमध्ये घडली घटना
विरोधी संघाला धावा गिफ्ट करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाची साथ सोडून हार्दिक पंड्या निघालाय नवीन दौऱ्यावर, पाहा फोटो