चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा सोमवारी (८ फेब्रुवारी) चौथा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडने भारतासमोर ४२० धावांचे आव्हान दिले आहे. या धावांचा पाठलाग करत असताना भारताने चौथ्या दिवसाखेर १३ षटकात १ बाद ३९ धावा केल्या आहेत.
भारताकडून शुभमन गिल ३५ चेंडूत १५ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा २३ चेंडूत १२ धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच अजून भारताला ३८१ धावांची गरज आहे. त्यामुळे आता ५ व्या दिवशी तिन्ही निकाल लागू शकतात. भारताला सामना जिंकण्यासाठी पाचव्या दिवशी ३८१ धावा कराव्या लागतील. तर इंग्लंडला आणखी ९ विकेट्सची विजयासाठी गरज आहे.
STUMPS 🏏
India finish day four on 39/1
They need 381 more to win. England need nine wickets.#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/2lon38JptO
— ICC (@ICC) February 8, 2021
भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का
इंग्लंडने दिलेल्या ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे सलामीला फलंदाजीसाठी आले. त्यांची सुरुवातही चांगली केली. काही शानदार शॉट या दोघांनी मारले. मात्र, ६ व्या षटकात जॅक लीचने रोहितला २० चेंडूत १२ धावांवर असताना त्रिफळाचीत केले. या खेळीत रोहितने १ चौकार आणि १ षटकार मारला. रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला आहे.
भारताने दुसऱ्या डावात ९ षटकात १ बाद ३४ धावा केल्या आहेत. भारताकडून सध्या शुभमन गिल २१ चेंडूत १४ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १३ चेंडूत ८ धावांवर खेळत आहे. तसेच अजून भारताला ३८६ धावांची गरज आहे.
इंग्लंडचा १७८ धावांवर दुसरा डाव संपुष्टात
इंग्लंडचा दुसरा डाव ४६.३ षटकांत १७८ धावांवर संपुष्टात आला आहे. आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने पहिल्या डावातील २४१ धावांची आघाडीसह भारतासमोर ४२० धावांचे आव्हान ठेवले आहे.
इंग्लंडच्या या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय ऑली पोप(२८), जोस बटलर(२४), डॉमनिक बेस(२५) यांनीही छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडला १७८ धावा करता आल्या. भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करताना १७.३ षटकात ६१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय शहाबाज नदीमने २ विकेट्स, तसेच जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.
R Ashwin’s six-wicket haul has helped India bowl England out for 178 👏
The hosts need 420 to win.#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/WeexhroI56
— ICC (@ICC) February 8, 2021
अश्विनने घेतल्या ६ विकेट्स
पोप बाद झाल्यानंतर बटलरने डॉमनिक बेसला साथीला घेत डाव सावरला. पण त्यांचीही जोडी नदीमने फार वेळ टिकू दिली नाही. त्याने डावाच्या ४२ व्या षटकात बटलरला ४० चेंडूत २४ धावांवर असताना बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात आर अश्विने डॉमनिक बेसला २५ धावांवर बाद केले. त्यानंतर आर अश्विनने जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनला बाद करत डावात ६ विकेट्स पूर्ण केल्या.
नदीमने ऑली पोपला बाद करत इंग्लंडला सहावा धक्का दिला
रुट बाद झाल्यानंतर पोपने बटलरसह इंग्लंडचा डाव पुढे नेला होता. हे दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले असतानाच विराटने शहाबाज नदीमला चेंडू दिला. नदीमने २९ व्या षटकात चौथ्या चेंडूवर पोपला ३२ चेंडूत २८ धावांवर असताना झेलबाद केले. त्याचा झेल शॉर्ट कव्हरला रोहित शर्माने घेतला.
इंग्लंडने दुसऱ्या डावात ३१ षटकांत ६ बाद १३४ धावा केल्या आहेत. सध्या जोस बटलर १८ चेंडूत १५ धावांवर आणि डॉमनिक बेस १३ चेंडूत ४ धावांवर नाबाद खेळत आहेत. इंग्लंड पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीमुळे सध्या ३७५ धावांसह पुढे आहे.
जसप्रीत बुमराहने दूर केला रुटचा मोठा अडथळा
एका बाजूने नियमित कालांतराने विकेट्स जात असताना दुसरी बाजू जो रुटने आक्रमक खेळत सांभाळली होती. मात्र अखेर त्याला जसप्रीत बुमराहने २४ व्या षटकात पायचीत केले आणि भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. रुटने ३२ चेंडूत ७ चौकारांसह ४० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर जोस बटलर फलंदाजीसाठी आला आहे.
इंग्लंडने दुसऱ्या डावात २६ षटकांत ५ बाद ११८ धावा केल्या आहेत. सध्या ऑली पोप २२ चेंडूत १७ धावांवर आणि जोस बटलर ११ चेंडूत १७ धावांवर नाबाद खेळत आहेत. इंग्लंड पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीमुळे सध्या ३५९ धावांसह पुढे आहे.
अश्विनच्या झटपट ३ विकेट्स
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना दुसऱ्या डावात आर अश्विनने बाद केले आहे. त्यानंतर इशांतने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तर अश्विनने बेन स्टोक्सला बाद करत डावातील त्याची तिसरी तर इंग्लंडची एकूण चौथी विकेट घेतली.
डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्सला बाद केल्यानंतर इंग्लंडचा डाव डॅनिएल लॉरेन्स आणि डॉमनिक सिब्लीने सांभाळला होता. त्यामुळे आता त्यांची जोडी भारताला वरचढ ठरतेय असे वाटत असतानाच पुन्हा एकदा अश्विन मदतीला आला आणि त्याने डावाच्या ११ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर सिब्लीला ३७ चेंडूत १६ धावांवर असताना बाद केले. सिब्लीचा झेल चेतेश्वर पुजाराने घेतला आहे.
त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या डावातील लय कायम राखत या डावातही काही शानदार चौकार ठोकले. पण त्यानंतर १५ व्या षटकात इशांत शर्माने डॅनिएल लॉरेन्सला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. लॉरेन्स ४७ चेंडूत १ चौकारासह १८ धावा करुन पायचीत झाला. त्यामुळे बेन स्टोक्स रुटला साथ देण्यासाठी मैदानात उतरला.
मात्र, तो फार काही खास करु शकला नाही. आर अश्विनने १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टोक्सला माघारी धाडले. स्टोक्स यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देऊन १२ चेंडूत ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर २१ व्या षटकात पंचांनी अश्विनच्या चेंडूवर ऑली पोपला बाद दिले होते. पण त्याने रिव्ह्यू घेतला. त्यात तो नाबाद असल्याचे दिसले.
इंग्लंडने दुसऱ्या डावात २१ षटकांत ४ बाद ८६ धावा केल्या आहेत. सध्या जो रुट २० चेंडूत २८ धावांवर आणि ऑली पोप १३ चेंडूत १३ धावांवर नाबाद खेळत आहेत. इंग्लंड पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीमुळे सध्या ३२७ धावांसह पुढे आहे.
अश्विनने पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट
भारताला ३३७ धावांवर बाद केल्यानंतर २४१ धावांची आघाडी मिळवूनही इंग्लंडने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला आहे. मात्र, या डावाच्या पहिल्याच चेंडूवर आर अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स अडकला. त्याला अश्विनने पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. त्याचा झेल स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेने घेतला. त्यामुळे पहिल्याच षटकात डॅनिएल लॉरेन्सला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागले आहे.
इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर २ षटकांत १ बाद १ धाव केली आहे. सध्या डॉमनिक सिब्ली ७ चेंडूत ० धावांवर आणि डॅनिएल लॉरेन्स ५ चेंडूत ० धावांवर नाबाद खेळत आहेत. इंग्लंड पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीमुळे सध्या २४२ धावांसह पुढे आहे.
भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात
भारताचा पहिला डाव ९५.५ षटकांत ३३७ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताला २४१ धावांनी पिछाडी स्विकारावी लागली आहे.
भारताकडून या डावात वॉशिंग्टन सुंदरने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत १२ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय रिषभ पंत(९१) आणि चेतेश्वर पुजारा(७३) यांनीही अर्धशतके केली. तर आर अश्विनने ३० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद ३३७ धावांचा टप्पा गाठता आला.
इंग्लंडकडून डॉमनिक बेसने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जॅक लीच, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
England have decided not to enforce the follow-on.
They lead by a whopping 241 runs.
How many more will they add?#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/bktUwIdi1s
— ICC (@ICC) February 8, 2021
झटपट पडल्या शेवटच्या विकेट्स
अश्विन बाद झाल्यानंतर काहीवेळातच शहाबाज नदीम देखील लगेचच बाद झाला. त्याला जॅक लीचने शुन्य धावेवर बाद केले. त्यापाठोपाठ जेम्स अँडरसनने इशांत शर्माला ९४ व्या षटकात ४ धावांवर बाद करत भारताला ९ वा धक्का दिला. अखेर ९६ व्या षटकात अँडरसनने जसप्रीत बुमराहला शुन्यावप बाद करत भारताचा डाव ३३७ धावांवर संपवला.
जॅक लीचने तोडली अश्विन-सुंदरची भागीदारी
चौथ्या दिवसाची सुरुवात सुंदर आणि अश्विनने चांगली केली होती. त्यांनी भारताला ३०० धावांचा आकडाही पार करुन दिला. मात्र, हे दोघे शतकी भागीदारीकडे वाटचाल करत असतानाच जॅक लीच या फिरकी गोलंदाजाने ८७ व्या षटकात आर अश्विनला बाद करत भागीदारी तोडली. अश्विनचा झेल यष्टीरक्षक जोस बटलरने घेतला. त्यामुळे अश्विन ९१ चेंडूत ३१ धावा करुन बाद झाला. त्याच्यात आणि सुंदरमध्ये ८० धावांची भागीदारी झाली. अश्विन बाद झाल्यानंतर शहाबाज नदीम फलंदाजीसाठी आला आहे.
भारताने पहिल्या डावात ८८ षटकांत ७ बाद ३०७ धावा केल्या आहेत. सध्या वॉशिंग्टन सुंदर १११ चेंडूत ५५९ धावांवर तर नदीम ५ चेंडूत ० धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच भारत अजून २७१ धावांनी पिछाडीवर आहे.
सुंदरचे अर्धशतक पूर्ण
चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावातील ७५ व्या षटकापासून आणि ६ बाद २५७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. भारताकडून तिसऱ्या दिवशी नाबाद असलेली वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विनची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. या दोघांनी दिवसाच्या सुरुवातीला चांगला खेळ केला.
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने काही शानदार शॉट मारत चौकार वसुल केले. याबरोबरच ८० व्या षटकात जॅक लीचला चौकार ठोकत त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. त्याने हे अर्धशतक ८२ चेंडूत पूर्ण केले. याबरोबरच सुंदर आणि अश्विन यांच्या अर्धशतकी भागीदारीही पूर्ण झाली.
भारताने पहिल्या डावात ८६ षटकांत ६ बाद ३०५ धावा केल्या आहेत. सध्या वॉशिंग्टन सुंदर १०५ चेंडूत ५८ धावांवर तर आर अश्विन ८९ चेंडूत ३१ धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच भारत अजून २७३ धावांनी पिछाडीवर आहे. सुंदर आणि अश्विन यांच्यात ८० धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.