रोहित शर्मा (Rohit Sharma)याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मंगळवारपासून (10 जानेवारी) घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. याआधी झालेल्या टी20 मालिकेत शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद शतकी खेळी करत रोहितपुढे मात्र प्रश्न निर्माण केला. ते कसे त्यासाठी आपण भारताची प्लेईंग इलेव्हन पहिल्या वनडेसाठी कशी असेल हे पाहू.
रोहित कर्णधार असल्याने त्याची जागा सलामीला निश्चित आहे. तसेच दुसऱ्या सलामीवीरासाठी शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांमध्ये रोहित कोणाला जागा देईल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी किशन जवळपास उत्तम पर्याय असून गिलला बाहेर बसावे लागेल. तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहली याची जागा निश्चितच आहे. चौथ्या क्रमांकासाठी केएल असून तो विकेटकीपरही असणार आहे. राहिला प्रश्न पाचव्या स्थानासाठी, येथे रोहितपुढे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार असे दोन पर्याय आहेत.
अय्यरची कामगिरी पाहिली तर तो मागील अनेक सामन्यांमध्ये मग तो कसोटी असो वनडे असो वा टी20 चांगली कामगिरी करत आहे. त्याने मागील 12 वनडे सामन्यात 590 धावा केल्या आहेत. यामुळे सूर्यकुमार बाहेर बसण्याची शक्यता आहे. एवढेच नाहीतर गोलंदाजीमध्येही युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनाही बाहेर बसावे लागेल, कारण अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीबरोबर चांगली फलंदाजीही करत आहेत.
ही मालिका भारतासाठी वनडे विश्वचषक 2023ची तयारीच असणार आहे. या मालिकेआधी भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली. त्यामध्ये भारताच्या काही युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.
भारताची संभाव्या प्लेईंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल , विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सूर्यासारखा खेळाडू शतकात एकदा जन्मतो”, कपिल पाजींनी उधळली स्तुतीसुमने
गॅरेथ बेलची सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्ती! रोनाल्डोच्या कारकिर्दीत राहिलेली महत्त्वाची भूमिका