मंगळवारी (दि. 12 सप्टेंबर) आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील चौथा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात झाली. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः रोहित व शुबमन गिल यांनी संघाला आक्रमक सुरवात दिल्यानंतर श्रीलंकेचा युवा फिरकीपटू दुनिथ वेललागे याने भारताचे तीन गडी बाद करत श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करून दिले.
मागील सामन्यात शतकी भागीदारी करणाऱ्या रोहित व गिल या जोडीने श्रीलंकेविरुद्धही आपला शानदार फॉर्म कायम राखला. त्यांनी 80 धावांची सलामी दिली. मात्र वेललागे गोलंदाजीला आल्यावर त्याने गिलला 12 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मागील सामन्यात शतक ठोकलेल्या विराट कोहली याला केवळ तीन धावांवर माघारी धाडले. तर अर्धशतक करून खेळत असलेल्या रोहित शर्मा याचा 52 धावांवर त्रिफळा उडवला. त्यामुळे भारतीय संघाचा डाव बिनबाद 80 असा असताना 3 बाद 91 असा घसरला.
(INDvSL Dunith Wellalage Took Three Wickets Of Rohit Sharma Virat Kohli And Shubman Gill)
हेही वाचा-
सुपर फोरच्या चौथ्या सामन्यात Team India ‘टॉस का बॉस’, श्रीलंकेलाही देणार का धोबीपछाड?
आता आशिया चषकात Reserve Day नाही; पावसाने खोडा घातला, तर ‘हे’ दोन संघ खेळणार Final