भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरूवारी (12 जानेवारी) खेळला जाणार आहे. कोलकाताच्या इडन गार्डनवर होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे. हा सामना जिंकत भारताची मालिकेत आघाडी, तर श्रीलंकेचा मालिका बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी फलंदाजीत उत्तम कामगिरी केली, मात्र गोलंदाजी काही प्रमाणात ढिसाळ झाली. यामुळे दोन्ही संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
भारताच्या संघात पाहिले तर श्रीलंकेच्या फलंदाजीवेळी दवामुळे (Dew) भारतीय गोलंदाजांना अडचण झाली, मात्र त्यांनी सुरूवातीला पाहुण्या संघाला एका मागोमाग धक्के दिले होते. यामुळे भारतीय संघात शक्यतो बदल होणार नाहीत, कारण कर्णधार रोहित शर्माने आधीच सांगितले होते की, तो अंतिम अकरामध्ये अधिक बदल करणार नाही. श्रीलंकेच्या संघात दिलशान मधुशंकाच्या जागी अनुभवी लाहिरू कुमारा येऊ शकतो. त्याचबरोबर दुनिश वेलालागे मागील सामन्यात काही प्रभावी ठरला नाही, तर त्याच्याजागी महीश तीक्क्षणा संघपुनरागमन करेल.
खेळपट्टीविषयी बोलायचे झाले तर गुवाहाटीची खेळपट्टी जशी होती तशीच काहीशी इडन गार्डनची आहे. ही खेळपट्टीही फलंदाजांना पूरक आहे. थंडीही अधिक असल्याने दवाचा फायदा फलंदाजांना होणार, तर पुन्हा एकदा गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेतील भारताने पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका कोलकातामध्ये समोरा-समोर-
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलकातामध्ये आतापर्यंत 5 वनडे सामने खेळले गेले. ज्यामधील 3 सामने भारताने तर एक सामना श्रीलंकेने जिंकला. तसेच एका सामन्याचा निकालच लागला नाही. श्रीलंकेने 1996मध्ये तो विजय मिळला होता. तर भारताने ईडन गार्डनवर 21 पैकी 12 वनडे सामने जिंकले आहेत.
दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघाची संभावित प्लेईंग इलेव्हन-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
श्रीलंका- पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, दसून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चरिथ असलंका, धंनजया डी सिल्व्हा, वानिंदु हसरंगा, दुनिश वेलालगे/महीश तीक्क्षणा, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा/ दिलशान मदुशंका, कसुन रजिथा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसी पुन्हा अव्वल स्थान पटकावण्यासाठी सज्ज, चेन्नईयन एफसीचे आव्हान
शानदार उद्घाटन सोहळ्याने वाजले हॉकी वर्ल्डकप 2023 चे बिगूल, विश्वविजयासाठी भिडणार 16 संघ