भारताने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा टी20 पाठोपाठ वनडे मालिकेतही पराभव केला आहे. यावरून संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) नक्कीच खूष असतील. द्रविडने बुधवारी (11 जानेवारी) 50वा वाढदिवस साजरा केला. त्याला क्रिकेटविश्वातील दिग्गजांमध्ये गणले जाते. त्याने भारताकडून 164 कसोटी आणि 340 वनडे याबरोबरच एक टी20 सामनादेखील खेळला. तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला 2021मध्ये भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले.
वनडेमध्ये 10000 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या 14 फलंदाजांपैकी द्रविड एक आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) दुसरा वनडे सामना सुरू असताना त्याची आकडेवारी टीव्ही स्क्रीनवर दाखवली गेली, तेव्हा त्याची रिऍक्शन पाहण्यासारखी होती. त्याच्या या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारत 2022मध्ये टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला. ती त्याची प्रशिक्षक म्हणून पहिली आयसीसी स्पर्धा होती. नुकतेच त्याने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत बीसीसीआयच्या आढावा घेणाऱ्या चर्चासत्रात सहभागी झाला होता. त्यामध्ये संघाच्या भविष्यातील योजनेवर चर्चा केली गेली. भारताचे लक्ष 2023च्या वनडे विश्वचषकामध्ये चांगली कामगिरी करण्यावर आहे, त्यासाठीही विशेष योजना आखल्या गेल्या.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1613543673299636225?s=20&t=jqPT4sQ3llAI5AfmMy9sTQ
भारताला 10 वर्षाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे. भारताने 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही आयसीसी स्पर्धा जिंकली नाही. सध्या भारत 2021-23 आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आहे. त्यासाठी भारताला फेब्रुवारी-मार्च महिन्यात घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला 216 धावांचे मापक लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारताने 86 धावसंख्येवरच 4 विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा केएल राहुल संयमाने फलंदाजी केली. त्याने 103 चेंडूत नाबाद 64 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मालिकेतील तिसरा सामना 15 जानेवारीला तिरुअंनतपुरम येथे खेळला जाणार आहे.
(INDvSL: Rahul Dravid’s stats flashed on TV screen during 2nd ODI his reaction goes viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेमध्ये 5व्या क्रमांकावर राहुलची बॅटींग जबरदस्तच! आकडेवारी एकदा पाहाच
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, महत्वाच्या खेळाडूंना वगळले