महिला क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघ बुधवारी (6 डिसेंबर) आमने सामने आले. भारत आणि इंग्लंड या दोन संघांमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका बुधवारी सुरू झाली. मालिकेतील तिन्ही सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले गेले आहेत. पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात गेला आणि संघआने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन युवा खेळाडू श्रेयांका पाटील आणि साकिया इशाक यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली गेली.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईत चांगले प्रदर्शन करण्याची इच्छा बोलून दाखवली. तसेच श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) आणि साकिया इशाक (Sakia Ishaque) यांच्या पदार्पणाची माहितीही दिली. हरमनप्रीत म्हणाली, “श्रेयंका आणि सायका आज त्यांचा पहिला सामना खेळत आहेत. आम्हाला फक्त मुंबईत चांगले क्रिकेट खेळायचे आहे.”
Many congratulations to Shreyanka Patil and Saika Ishaque on making their India debut. pic.twitter.com/u3llnOz31e
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, दिप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पुजा वस्त्राकर, कनिका कहुजा, रेणुका सिंग, साकिया इशाक.
इंग्लंड – डॅनियल वॅट, सोफिया डंकले, ऍलिस कॅप्सी, नेट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट, एमी जोन्स (यष्टीरक्षक फलंदाज), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, मोहिका गौर.
(INDWvsENDW । Shreyanka Patil and Sakia Ishaque are making their T20I Debut for Team India.)
महत्वाच्या बातम्या –
रवी बिश्नोईची मोठी झेप, बनला जगातील नंबर एकचा गोलंदाज! ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली महत्वाची
6 डिसेंबरचा जन्म असलेल्या 11 तगड्या क्रिकेटपटूंची ’बर्थडे इलेव्हन’! सहा भारतीयांचा समावेश