भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा यशस्वी राहिला. उभय संघातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शनिवारी संपली. मालिकेतील तिन्ही सामने भारतीय संघाच्या नावावर झाले. शनिवारी (24 सप्टेंबर) खेळल्या गेलेला शेवटचा सामना दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. झुलनने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती आणि संघाने तिची निवृत्ती नेहमी लक्षात राहण्यासारखी बनवली. मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप देऊन आणि झुलनला खांद्यावर उचलल्यामुळे हा दिवस भारतीय महिला संघाच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहणारा ठरेल.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. भारताला फलंदाजी करताना सर्व 50 षटके खेळून देखील काढता आली नाहीत. 45.4 षटकांमध्ये भारतीय संघ 169 धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडसाठी विजय सोपा वाटत होता, पण नंतर भारतीय गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि इंग्लंडला 43.3 षटकांमध्ये 153 धावा केल्यानंतर सर्वबाद झाला. एकदिवसीय मालिकेतील भारताने मिळवलेला हा सरल तिसरा विजय ठरला.
तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 विकेट्स राखून, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 88 धावांच्या अंतराने भारताने विजय मिळवला. झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिचा हा शेवटचा सामना होता. तिने यामध्ये दोन विकेट्स घेत विजयासाठी मोलाचे योगदान दिले. सामना जिंकल्यानंतर संघातील इतर सहकारी खेळाडूंनी झुलनला खांद्यावर घेतल्याचे पाहालायला मिळाले. हा व्हिडिओ चाहत्यांकडून सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे. झुलनने तिच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात एक जबरदस्त त्रिफळा उडवला.
India Clean sweep the series against England of 3-0,it has perfet respect to #JhulanGoswami
In their last game, congratulations to you girl's for your dedication toward The Nation And Cricket Also #ENGvsIND #ENGvsIND pic.twitter.com/HMuMiP2uzm— ashis praharaj (@ashisppraharaj) September 24, 2022
भारतीय संघ जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला, तेव्हा सलामीवीर स्मृती मंधानाने संयमी खेळ दाखवत अर्धशतक केले. स्मृतीने 79 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. तसेच मध्यक्रमत दीप्ती शर्माने देखील अर्धशतकी खेळी केली. दीप्तीने 106 चेंडूत 68 धावा केल्या. त्याचसोबत पूजा वस्त्रकारच्या 22 धावा सोडल्या, तर भारताची एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकली नाही. केट क्रॉसने भारताच्या सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या.
last over of her international career was a wicket maiden 🙌
Take a bow, Jhulan Goswami 🐐❤️ pic.twitter.com/9wa4NiCU4q
— Akash (@im_akash196) September 24, 2022
भारताने दिलेल्या 170 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघ सहजासहजी गाठेल, असे वाटत होते. परंतु त्यांचा संघ देखील स्वस्तात बाद झाला. चार्ली डीन हिने इंग्लंडसाठी सर्वाधिक 47 धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज एमी जॉन्सने 28 धावा केल्या, तर एमा लांबने 21 धावांचे योगदान दिले. इंग्लंडची दुसरी एकही फलंदाज 10 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. भारतासाठी रेणुका सिंगने सर्वात जास्त 4 विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
थोडक्यात वाचला हॅरी ब्रुक! हेलमेटच्या ग्रीलमध्ये अडकला चेंडू, पाक गोलंदाजाची रिएक्शन व्हायरल
झूलनला टीम इंडियाचा विजयी निरोप! इंग्लंडला व्हाईट वॉश देत ऐतिहासिक मालिकाविजय
‘मी विजयाचे श्रेय घेत नाही…’, सामना जिंकल्यानंतर कार्तिकने रोहितचेच केले कौतुक