वय २५ वर्षे… अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये केवळ १० सामन्यांचा अनुभव तर देशांतर्गत स्तरावर खेळले आहेत केवळ २२ सामने. आतापर्यंत कसल्याही असाधारण प्रदर्शनाची नाही नावावर नोंद. तरीही आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा (सीएसके) भाग आहे हा वेगवान गोलंदाज. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने कदाचित त्याला संघात स्थान देताना त्याची आकडेवारी पाहिली नाही, तर त्याच्यातील प्रतिभेला प्राथमिकता दिली. त्यामुळे हा गोलंदाज गेल्या २ हंगामापासून सीएसकेचा भाग आहे. हा गोलंदाज म्हणजे, ‘मोनू कुमार’.
आज(२५ ऑक्टोबर) त्याला चेन्नईकडून प्रथमच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. या संधीसाठी मोनू कुमार गेले २ वर्षे वाट पाहात होता.
२ वर्ष पाहिली आयपीएल पदार्पणाची वाट
मोनू कुमार हा जरी २०१८पासून सीएसकेचा भाग असला तरी, त्याला आतापर्यंत एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता त्याचे आयपीएल पदार्पणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे .
मोनू कुमार, नक्की आहे तरी कोण? (Information About Chennai Super Kings Fast Bowler Monu Kumar) चला तर जाणून घेऊया…
कुमार हा मुळचा झारखंडची राजधानी रांची म्हणजे धोनीच्या शहरातील रहिवासी आहे. हा वेगवान गोलंदाज अचूक लेंथच्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. २०१७ साली धोनी झारखंड संघाकडून विजय हजारे ट्रॉफी टूर्नामेंटमध्ये खेळला होता. त्यावेळी कुमारदेखील झारखंड संघाचा भाग होता. त्यामुळे कुमार आणि धोनीने एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. दरम्यान धोनीने त्याच्यातील प्रतिभेला हेरले.
कुमारने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये एका षटकात जवळपास ५ धावा दिल्या आहेत. तर, देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये प्रति षटक जवळपास ६.९० धावा खर्च केल्या आहेत. तो २०१४ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. त्याने आतापर्यंत १० अ दर्जाचे सामने खेळत ११ विकेट्स चटकावल्या आहेत. तर, २२ देशांतर्गत टी२० सामने खेळत २५ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त तो गरजेनुसार फलंदाजीदेखील करु शकतो.
जरी कुमारला आतापर्यंत आपल्यातील प्रतिभेनुसार प्रदर्शन करता आले नसले, तरी तो सीएसकेकडून दमदार प्रदर्शन करत आपली प्रतिभा जगासमोर आणू शकतो. त्यामुळे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, तो आज बेंगलोरविरुद्ध कशी कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
चेंडू आहे की बंदुकीची गोळी! नॉर्किएने फेकलेल्या योर्करवर त्रिपाठी क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
दिल्लीच्या फलंदाजांना लोळवणारा मिस्ट्री स्पिनर तुम्हाला माहित आहे का? पहिल्यांदाच घेतल्यात ५ विकेट्स
करामती खान! राशिदच्या न उमगणाऱ्या फिरकीवर केएल राहुलची दांडी गुल, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ