इंग्लंड | भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. ही भेट पवार यांच्या निवासस्थानी झाली.
याचे अधिकृत ट्विट राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या ट्विटर हॅंडलवरुन करण्यात आले आहे.
या भेटीमागचे कारण मात्र समजू शकले नाही.
https://twitter.com/NCPspeaks/status/1029306497505869824
रहाणे सध्या अतिशय खराब फाॅर्ममधून जात आहे. दोन कसोटीतील ४ डावात त्याला जेमतेम ४८ धावा करता आल्या आहेत.
अजिंक्य रहाणे ज्या रणजी संघाचा आजपर्यंत भाग राहिला आहे त्या मुंबई क्रिकेट असोशियशनचे पवार अनेक वर्ष अध्यक्ष राहिले आहेत. पवार या असोशियशनचे अध्यक्ष असण्याच्या काळातच रहाणेची क्रिकेटमधील कारकिर्द खऱ्या अर्थाने बहरली होती.
तर पवारांनी या काळात मुंबई क्रिकेट असो, बीसीसीआय तसेच आयसीसीचे अध्यक्षपद सांभाळले आहे.
अजिंक्य रहाणेची कारकिर्द-
रहाणे ४७ कसोटीत २९४१ धावा तर वनडेत ९० सामन्यात २९६२ धावा केल्या आहेत. तसेच २० टी२० सामन्यात ३७५ धावा केल्या आहेत. दोन कसोटी सामन्यात नेतृत्व करताना त्याने दोन विजय संघाला मिळवुन दिले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा
–तब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम
–कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण