आयपीएल 2023 हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला आहे. डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला हंगामात आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाही. अशात संघाचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी याच्या दुखापतीची माहिती समोर येत आहे. दुखापतीमुळे नागरकोटीला आयपीएलच्या या 16 व्या हंगामातून माघार घ्यावी लगत आहे.
आयपीएल 2023 मध्ये खेळाडू मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त झाले आहेत. 16व्या आयपीएल हंगामाची सुरुवात होण्याआधीच अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले गेले. दुखापतीमुळे या खेळाडूंनी चालू हंगामातून माघार घेतली. दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार रिषभ पंत देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये भाग घेऊ शकला नाही. खेळाडूंच्या दुखापतीचा तोटा इतर आयपीएल फ्रँचायझींप्रमाणे दिल्ली कॅपिटल्सा देखील बसला आहे. अशातच बुधवारी (19 एप्रिल) कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) याच्या दुखापतीची माहिती समोर आली. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल हंगामातून माघार घ्यावी लागत आहे.
https://www.instagram.com/p/CrNlMNWLfNz/?utm_source=ig_web_copy_link
दिल्ली कॅपिटल्सकडून नागरकोटीला चालू हंगामात अजून एकही सामना खेळता आला नव्हता. संघाता तो दुखापतीतून सावरण्याची अपेक्षा होती. मात्र, असे होऊ शकले नाहीये. नागरकोटीच्या आयपीएल कारकिर्दीचा एकूण विचार केला, तर त्याने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. आकडेवारी प्रभावित करणारी नसली, तरी त्याच्या चेंडूच्या गतीने मात्र अनेकांना प्रभावित केले आहे. दिल्लीने या वेगवान गोलंदाजाला 1.10 कोटी रुपयांमध्ये यावर्षी रिटेन केले होते.
दिल्लीचे चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर संघाकडून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. कर्णधार डेविड वॉर्नरव्यतिरिक्त एखही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाहीये. गोलंदाजी विभागात संघ पूर्णपणे अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्किया यांच्यावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या पाच सामन्यांमध्ये पाचही वेळी दिल्लीला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. अशात राहिलेल्या सामन्यांमधून हंगामात पुनरागमन करणे देखील दिल्लीसाठी कठीणच असणार आहे. (Injured Nagarkoti ruled out of the IPL 2023. )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड ब्रेक! लखनऊविरुद्धच्या पहिल्याच षटकात बोल्टने मोडला इरफान पठाणचा विक्रम
बोल्ट बनतोय बॉस! पुन्हा टाकली पहिलीच ओव्हर मेडन, चालू हंगामात घालतोय धुमाकूळ