बार्सिलोनाचा विजयी रथ रोखण्यात कोणता संघ नाही तर दुखापतग्रस्त खेळाडू कारणीभूत ठरतील की काय असा प्रश्न अर्नेस्टो वॅलवर्डे समोर येऊन उभा आहे. संघात ६ ते ७ खेळाडू आधीच दुखापतग्रस्त असल्यामुळे बार्सिलोना बी संघातील काही खेळाडूंना प्रशिक्षणासाठी मुख्य संघात समाविष्ट करावे लागले आहे.
संघाला सर्वाधिक फटका बसलाय तो ओसुमान डेम्बेलेच्या दुखापतीने. विक्रमी १०५ मिलीयन युरो किंमतीला डोर्टमंडकडून घेतलेल्या डेम्बेलेला गेटाफे बरोबरच्या सामन्यात डाव्या पायाच्या स्नायूंमध्ये झालेल्या दुखापतीने ३/४ महिन्यांसाठी बाहेर जावे लागले. पण आता चर्चा आहे ती डेम्बेलेच्या पुनरागमनाची.
त्याचे डाॅक्टर साकरी ओरावांनी दिलेल्या माहितीनुसार डेम्बेलेला आता दुखत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तो डिसेंबरमध्येच पुनरागमन करायला तयार असेल आणि बहुचर्चित एल क्लासिकोच्या आधी संघासाठी उपलब्ध असेल. पण बार्सिलोनाचे कोच अर्नेस्टो वॅलवर्डे कोणतीही जोखीम घेण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी त्याला जानेवारीपासूनच खेळवणार असल्याचे सांगितले.
बार्सिलोनाच्या उर्वरीत दुखापतग्रस्त खेळाडूंची नावे:
१. राफीन्हा
२. एलेक्स विदाल
३. आद्रा तुरान
४. आंद्रे इनिएस्टा
५. सर्जी रोबर्टो
६. आंद्रे गोमेस
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)