---Advertisement---

विश्वचषकापूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव, स्टार फिरकीपटूचा संघात समावेश

On: शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024 8:40 PM
---Advertisement---

श्रीलंका पुरूष संघ सध्या न्यूझीलंडसोबत घरच्या मैदानावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यातील पहिल्या सामन्यातील तिसरा दिवस संपला. तत्पूर्वी स्टार फिरकीपटू इनोका रणवीराचा (Inoka Ranaweera) 2024च्या महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup) स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे, ज्याचे नेतृत्व त्यांची करिष्माई अष्टपैलू चमारी अट्टापट्टू करणार आहे.

इनोकाला श्रीलंकेच्या विजयी महिला आशिया चषक मोहिमेतून व त्यानंतरच्या आयर्लंडच्या पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यातून वगळण्यात आले होते. ती शेवटची टी20 महिला विश्वचषक पात्रता 2024 मध्ये श्रीलंकेकडून खेळली होती, ही स्पर्धा युएई मध्ये जिंकली होती.

इनोका रणवीराच्या (Inoka Ranaweera) आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने श्रीलंकेसाठी 82 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 5.86च्या इकॉनॉमी रेटने 91 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान तिचा स्ट्राईक रेट 18.4 राहिला आहे. 7 धावा देऊन 4 विकेट्स घेणे ही तिची सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे.

आशियाई देशातील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे 20 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2024 महिला टी20 विश्वचषक बांगलादेशातून युएईमध्ये मध्ये हलवला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे यजमानपद राखणार आहे, तर अमीरात क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

श्रीलंका संघ- चमारी अट्टापट्टू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षी डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहारी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसुर्या, सुगंनी कुमारी, सुगंधी कुमारी, गौतम अमा कांचना

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs BAN: एकाच दिवशी पडल्या 17 विकेट्स, 1979 नंतर चेपॉकवर पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN: 17 धावांवर बाद होऊनही कोहलीने रचला इतिहास!
‘चुकीच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली’, बांगलादेशविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या रोहितला चाहत्यांचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---