आय़पीएल २०२० पुढे ढकल्यात आली आहे. २९ मार्चला सुरु होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यामागेच कारण अर्थातच जगात सध्या सर्वत्र चर्चा असलेला कोरोना व्हायरस होय.
जर आयपीएल १५ एप्रिलला सुरु होणार असेल तर यात परदेशी खेळाडूंचा सहभाग जवळपास अशक्यच आहे. कारण या खेळाडूंना व्हिजा तसेच अन्य सोपस्कर पार पाडायला एवढा कालावधी पुरेसा नाही.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एक भाष्य केले होते. आम्हाला आयपीएल एक दर्जेदार पद्धतीने खेळवायची आहे. तिला देशांतर्गत सईद मुश्ताक अली ट्राॅफीप्रमाणे खेळवायची नाही. सईद मुश्ताक अली ट्राॅफी ही भारताची देशांतर्गंत टी२० स्पर्धा आहे. याच वक्तव्याचा भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
“आयपीएल ही पुर्णपणे आपण कोरोनाला कसे रोखतो यावर अवलंबून आहे. परदेशी खेळाडूंना लगेच मिळणे अशक्य आहे. परदेशी खेळाडूंनी स्पर्धेला वेगळेच महत्त्व प्राप्त करुन दिले आहे व ती मनोरंजक केली आहे. त्यामुळे त्यांचं खेळणं महत्त्वाचं आहे,” असे गावसकर म्हणाले.
“परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलेले भाष्य दुर्दैवी आहे. ते एका महान व्यक्तीचा (सईद मुश्ताक अली) अपमान करत आहेत. तर सईद मुश्ताक अली स्पर्धेचा दर्जा चांगला नसेल असे त्यांना वाटतं असेल तर ती खेळायचीच कशाला? तसेच सईद मुश्ताक अली स्पर्धेचा दर्जा का ठिक नाही हेही त्यांनी स्पष्ट करावे,” असेही गावसकर पुढे म्हणाले.
सईद मुश्ताक अली ट्राॅफीबद्दल थोडक्यात माहिती-
सईद मुश्ताक अली हे भारताकडून १९३४ ते १९५२ या काळात ११ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ३२.२१च्या सरासरीने ६१२ धावा केल्या होत्या. दोन शतके व तीन अर्धशतकांचा यात समावेश होता. २००५मध्ये वयाच्या ९०व्या वर्षी त्यांचे इंदोर येथे निधन झाले. २००८-०९ सालापासून त्यांच्या नावाने भारतात सईद मुश्ताक अली ट्राॅफी खेळवली जाते. यात रणजी स्पर्धेत भाग घेणारे सर्व संघ भाग घेतात. २०१६-१७मध्ये ही स्पर्धा विभागांमध्ये खेळविण्यात आली.
भारतात सईद मुश्ताक अली ट्राॅफी प्रमाणेच रणजी ट्राॅफी, दुलीप ट्राॅफी, इराणी ट्राफी व विजय हजारे ट्राॅफी या महत्त्वाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा होतात.
ट्रेडिंग घडामोडी-
–१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस
–एकाचवेळी विरासह ७ खेळाडूंनी ट्विट करण्याचे कारणंही आहे तसंच मोठं
–जर आयपीएल झाली नाही तर या ५ खेळाडूंचं होणार सर्वाधिक नुकसान
–त्या खेळीने युवराजचे नाव अजरामर तर केलंच पण टीम इंडियाचं टेन्शनही दूर केलं
–भारतीयांसारखं क्रिकेटवर प्रेम जगात कुणीच करत नाही