पुणे : मराठवाडा मित्रमंडळ क़ॉलेज ऑफ कॉमर्सच्या (एमएमसीसी) साध्वी धुरी हिने मएसो सीनियर कॉलेजच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत एकूण सात प्रकारांत अव्वल क्रमांक पटकावला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे शहर विभागीय क्रीडा समिती यांच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा डेक्कन जिमखाना येथील टिळक टँक येथे ही स्पर्धा झाली. क्रीडा भारती पुणे महानगरचे अध्यक्ष शैलेश आपटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, पुणे शहर विभागीय क्रीडा समितीचे सचिव शिरीष मोरे, स्पर्धा सचिव अभिजीत गर्ग उपस्थित होते.
या स्पर्धेत साध्वीने ४०० मीटर वैयक्तिक मिडले, २०० मीटर वैयक्तिक मिडले, १०० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर बटरफ्लाय, २०० मीटर फ्री स्टाइल, १०० मीटर फ्री स्टाइल आणि ५० मीटर फ्री स्टाइलमध्ये अव्वल क्रमांक पटकावला. विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
निकाल – ५० मीटर फ्री स्टाइल – साध्वी धुरी (एमएमसीसी) – ३१.९७ सेकंद, नेहा सागरे (एसकेएनसीसी) – ३२.४४ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – ३३.६० से.
१०० मीटर फ्री स्टाइल – साध्वी धुरी (एमएमसीसी) – १ मि. १३.७५ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – १ मि.१६.१३ से., श्रेया वांजळे (कावेरी) – १ मि. १९.७२ से.
२०० मीटर फ्री स्टाइल – साध्वी धुरी (एमएमसीसी) – २ मि. ५२.१५ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – २ मि. ५३.१६ से., श्रेजा वांजळे (कावेरी) – ३ मि. ४.४४ से.
५० मीटर बटरफ्लाय – साध्वी धुरी (एमएमसीसी) – ३३.९१ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – ३८.७२ से., गीता मालुसरे (एफसी) – ३८.९७ से.
१०० मीटर बटरफ्लाय – साध्वी धुरी (एमएमसीसी) – १ मि. १८.२५ से,, भक्ती कालमेघ (टीएसएसएम) १ मि. २०.७२ से., दिव्या मारणे (जीसीसी) – १ मि. ३५.१२ से.
२०० मीटर बटरफ्लाय – नेहा सागरे (एसकेएनसीसी) – ३ मी. ००.४५ से., दिव्या मारणे (जीसीसी) – ३ मि. १०.१० से., गीता मालुसरे (एफसी) – ३ मि. १२.१५ से.
२०० मीटर वैयक्तिक मिडले – साध्वी धुरा (बीएमसीसी) – साध्वी धुरी (एमएमसीसी) – ३ मि. १०.१३ से., दिव्या मारणे (जीसीसी) – ३ मि. १५.१२ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – मि. १७.१२ से.
४०० मीटर वैयक्तिक मिडले – साध्वी धुरी (बीएमसीसी) – ६ मि. ३.१० से., दिव्या मारणे (जीसीसी) – ६ मि.२०.८० से., अंजली थोरात (व्हीआयटी) – ६ मि. ३०.२१ से.
२०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – भक्ती कालमेघ (टीएसएसएम) – ३ मि. १२.१९ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – ३ मि. ४८.६९ से., वैधिनी गुजराथी (व्हीसीएसीएस) – ४ मि. ०६.१० से.
१०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – भक्ती कालमेघ (टीएसएसएम) – १ मि. २६.८४ से., वर्धिनी गुजराथी (व्हीसीएसीएस) – १ मि. ४९.०० से., अनन्या नामदे (कमिन्स) – १ मि. ४९.८४ से.
५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – भक्ती कालमेघ (टीएसएसएम) – ३९.२८ से., अनन्या नामदे (कमिन्स) – ४७.६२ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – ४८.०० से.
२०० मीटर बॅक स्ट्रोक – अंजली थोरात (व्हीआयटी) – ३ मि. १४.४१ से., श्रेया वांजळे (कावेरी) – ३ मि. १८.६२ से., नेहा सागरे (एसकेएनसीसी) – ३ मि. २१.५६ से.
१०० मीटर बॅक स्ट्रोक – अंजली थोरात (व्हीआयटी) – १ मि. ३१.६० से., नेहा सागरे (एसकेएनसीसी) – १ मि. ३१.७२ से., श्रेया वांजळे (कावेरी) – १ मि. ३४.५० से.
५० मीटर बॅक स्ट्रोक – नेहा सागरे (एसकेएनसीसी) – ४१.६५ से., अंजली थोरात (व्हीआयटी) – ४२.०६ से., श्रेया वांजळे (कावेरी) – ४४.०६ से.
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या पीसीबीएसएल स्पर्धेत मनिषा रॉयल्स व रॉकेट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत
‘आशा आहे पुढचे…’, आशिया चषक जिंकल्यानंतर केएल राहुलची प्रतिक्रिया चर्चेत