साल २०२० चा आयसीसी महिला टी२० विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अविस्मरणीय राहिला होता. या विश्वचषकात दमदार कामगिरी करत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. या महत्त्वाच्या लढतीत त्यांच्यापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलिया महिला संघाचे आव्हान होते. तब्बल ८५ धावांच्या फरकाने भारतीय संघाने हा सामना गमावला होता. परंतु या विश्वचषकातील काही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा विसर आजही कोणाला पडला नाही. यातीलच एक महत्त्वाचे नाव अर्थात राधा यादव.
जन्माने मुंबईकर असलेल्या राधाचे मुळे गाव हे उत्तरप्रदेशात असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती बडोदा संघाकडून खेळते. तीने टीम इंडियाकडून केवळ मर्यादित षटकांच्या प्रकारात अर्थात वनडे आणि टी२० प्रकारात आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
-राधाचा जन्म २१ एप्रिल २००० रोजी झाला असून ती आज २१ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म मुंबई शहरात झाला आहे.
-तिला मरीन ड्राईव्हला फिरायला आवडते व तिची आवडती अभिनेत्री दिपीका पदुकोन आहे.
-क्रिकेटर असल्यामुळे तिने चाॅकलेट व आईसक्रीम खाणे बंद केले आहे. हे दोनही पदार्थ तिला विशेष आवडीचे होते.
-तिला अभ्यास करणे आवडत नाही. ती रिकामा वेळ मिळेल तेव्हा बॅटमिंटन, खो-खो किंवा कबड्डी असे खेळ ती खेळते.
-५ वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर तीने लगेच भारतीय संघात स्थान मिळवले. जेव्हा ती संघाची सदस्य झाली होती, तेव्हा तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
-तिचे मुळ गाव उत्तरप्रदेशमधील असून ती कधीही तिकडे गेली नाही.
-राधा फिरकीपटू असूनही तिला गोलंदाजीपेक्षा फलंदाजी जास्त आवडते.
-राधाने आतापर्यंत ३७ टी२० सामन्यात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. दरम्यान तीने ४८ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच तिला मार्च २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे पदार्पणाची संधी मिळाली होती. या सामन्यात तिला गोलंदाजीस पाठवले गेले नाही. परंतु फलंदाजी करताना तिने अर्धशतक (६८ धावा) झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
DCvMI: निर्णायक षटकात २ नो बॉल टाकत बुमराह ठरला खलनायक, नावे झाला लाजिरवाणा विक्रम
दिल्ली-मुंबई लढतीत रोहित शर्माला दुखापत, पुढील सामना खेळणार की नाही? पाहा काय म्हणाला
एवढे मोठे क्रिकेटर असलेले कपिल देव ‘या’ व्यक्तीला घाबरुन कुठे-ना-कुठे लपण्यासाठी जागा शोधायचे






