मुंबई । भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने गुरुवारी ‘आंतरराष्ट्रीय डावखुरा दिना’ निमित्ताने क्रिकेटमधील दिग्गज डावकरी खेळाडूंना सलाम केला आहे. यावेळी युवराजने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि अॅडम गिलख्रिस्ट फोटो शेअर करत कौतुक केले आहे.
युवराजने ट्विटरवर लिहिले की, ‘येथे काही डाव्या हाताने खेळणारे दिग्गज खेळाडू आहे जे क्रिकेटने आपल्याला दिले. तुम्हीसुद्धा या सुवर्ण यादीमध्ये नावे जोडा आणि तुमचे आवडते डावखुरे फलंदाज कोण हे माझ्याबरोबर शेअर करा.’
https://twitter.com/YUVSTRONG12/status/1293811497991147521?s=19
युवराज स्वत: डावखुरा फलंदाज आहे आणि त्याने वनडे क्रिकेटमध्ये अनेक सामने डाव्या हाताने फलंदाजी करताना एक हाती जिंकून दिले आहेत. युवराजने 2000 मध्ये केनियाविरुद्ध खेळताना वनडे सामन्यात पदार्पण केले होते. त्याने कारकिर्दीच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज अर्धशतकी खेळीही केली होती.
38 वर्षीय युवराज 2007 चा टी20 विश्वचषक आणि 2011 विश्वचषकामध्ये भारताला विजेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवराजने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध जून 2017 मध्ये खेळला होता. तसेच जून 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या युवराज विदेशातील टी 20 लीगमध्ये खेळताना दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच होता,’ ४१ शतके ठोकणाऱ्या खेळाडूने केले मोठे वक्तव्य
चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबिरात रवींद्र जडेजा होणार नाही सहभागी, हे आहे कारण
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी; तरीही ठोकले अर्धशतक
ट्रेंडिंग लेख –
या ३ खेळाडूंनी मारलेत सीएसकेसाठी सर्वाधिक षटकार
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास
टक्कल असलेल्या क्रिकेटपटूंची ‘ऑल टाईम ११ टेस्ट टीम’, पहा कोण झालंय कर्णधार