इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१चा हंगाम कोरोनामुळे संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला गेला होता. तर २०२२चा हंगाम भारतात खेळला गेला. या हंगामात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे अनेक खेळाडूंच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले. तर दुसरी बाब ही की काही यशस्वी संघ प्लेऑफच्या फेरीतही पोहोचले नाहीत.
या स्पर्धेदरम्यान काही संघांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने अनेक खेळाडू याच्या कचाट्यात आले. त्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ खूपच कमनशीबी दिसला. या संघाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शने (Mitchell Marsh) स्पर्धा आणि त्याच्या आयपीएलमधील प्रवासाबाबत क्रिकेट डॉट कॉम एयूशी बोलताना मोठे विधान केले आहे.
सहावी आयपीएल स्पर्धा खेळणारा मार्श मुंबई इंंडियन्सकडून (Mumbai Indians) झालेल्या पराभवाने खूपच निराश दिसला. दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी या सामन्यात जिंकणे महत्वाचे होते. पण हा सामना त्यांनी ५ विकेट्सने गमावला. त्यानंतर त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही थोडक्यात भंगले आणि ते स्पर्धेबाहेर झाले.
पंधराव्या आयपीएल दरम्यान मार्शची कामगिरी सतत खराब होत होती. यामुळे तो निराशही झाला होता. “कितीही प्रयत्न केला तरी माझी कामगिरी सुधारत नव्हती. असे वाटत आहे भारतात मला खूप शाप दिला जात आहे. त्यामुळेच मला कोरोनाही झाला,” असे मार्शने धक्कादायक वक्तव्य केले आहे.
मार्श जेव्हा आयपीएलमध्ये आला, तेव्हा त्याला दुखापतीमुळे आणि नंतर कोरोनामुळे अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्धच्या सामन्याआधी त्याला कोरोना झाला होता. नंतर त्याने संघात पुनरागमन करत चांगली फलंदाजी केली. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ८९ धावांची खेळी केली होती. दिल्लीचा (Delhi Capitals) संघ २०२२च्या हंगामात १४ पैकी ७ सामने जिंकत गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला. यावेळी मार्शला आठच सामन्यात खेळता आले. त्याने १३२.८०च्या स्ट्राईक रेटने खेळताना २ अर्धशतके करत २५१ धावा केल्या आहेत. तसेच त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळाले आहे.
२०२२ हंगामाचा शेवट नवख्या गुजरात टायटन्स संघाच्या विजेतेपदाने संपला. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने राजस्थान रॉयल्स अंतिम सामन्यात ७ विकेट्सने पराभूत केले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोट्यवधी मने जिंकणाऱ्या धोनीचेच ‘या’ आर्टिस्टने जिंकले मन, चित्र पाहण्यासाठी स्वत: गेला माही
मुंबई इंडियन्सने दिली न विसरण्यासारखी जखम, आयपीएलनंतर ‘या’ अष्टपैलूचा मोठा उलगडा
स्टार स्टडेड कोची टस्कर्स एकाच सीझननंतर आयपीएलमधून बाहेर का झाली?






